शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोरमध्ये वॉकिंग करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला;चार आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:15 IST

- मोबाईल लुटणारे चार आरोपी ८ तासांत जेरबंद

लोणी काळभोर (पुणे) - लोणी काळभोर परिसरात वॉकिंगसाठी बाहेर पडलेल्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला करून मोबाईल लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या आठ तासांत चारही आरोपींना अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली.ही घटना ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील जाचक वस्ती परिसरात घडली. महादेव रामभाऊ कापसे (वय ६३) हे मित्रासोबत रिव्हरव्ह्यू सिटीमागील रेल्वे लाईनजवळ चालत असताना मोटारसायकलवर आलेल्या चार जणांनी त्यांना अडवले.आरोपींनी शिवीगाळ करत खिशातील मोबाईल आणि पैसे देण्याची धमकी दिली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी दगड, पाईप आणि दांडक्याने त्यांच्या डोक्यावर व शरीरावर बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने कापसे बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी सुमारे ७ हजार रुपयांचा मोबाईल लुटून घटनास्थळावरून पळ काढला.या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल जाधव आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्यात आली.अखेर गंगानगर परिसरातून सुजल झेंडे (२०), शुभम चव्हाण (२४), ओंकार चिंतलु (३१) आणि अभिजीत सोनकांबळे (२०) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या असून एकूण सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र