शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकतकराची २७ कोटी थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 20:39 IST

- महापालिका प्रशासनाची कारवाईकडे डोळेझाक

- हिरा सरवदेपुणे : दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून एका गर्भवती महिलेवर उपचार करणे नाकारून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकतकर थकविला आहे. रुग्णालयाने २०१९ पासून महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही. तरीही सामान्यांच्या घरासमोर बँड वाजविणाऱ्या महापालिका प्रशासनाने रुग्णालयावर कारवाई न करता डोळेझाक केल्याचे समोर आले आहे.

लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनतर्फे चालविल्या जात असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून भरती करून घेतले नाही. तिला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी व विविध सामाजिक संस्थांनी रुग्णालयाच्या या कृतीचा निषेध करत रुग्णालयासमोर आंदोलन केले.या घटनेचा राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे पैशांसाठी उपचार नाकारणाऱ्या या रुग्णालयाने मात्र, महापालिकेचा तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकतकर थकविला आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाने २०१९ वर्षापासून गेल्या सहा वर्षांत महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही.

सामान्य पुणेकरांनी कर थकविला, तर महापालिकेकडून थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवला जातो. मिळकत सील करून ती जप्त केली जाते, तिचा लिलाव केला जातो. असे असताना महापालिका प्रशासनाने मंगेशकर फाउंडेशनच्या थकबाकीकडे मात्र डोळेझाक केली आहे.

अशा प्रकारे रुग्णालयाने थकविला महापालिकेचा मिळकत कर

वर्ष -             मिळकत कराची रक्कम (कोटींमध्ये)            २०१९ -            ६५७६३९

२०२० -            ४१०१०८९०२०२१ -            ४३६९७७५४

२०२२ -            ६१८८७२४१२०२३ -            ५८९८४२०८

२०२४ -            ६७६२५१४२-----------------------------------------

एकूण -             २७३८६२८७४----------------------------------------

टॅग्स :Deenanath Mangeshkar Hospitalदीनानाथ मंगेशकर रुग्णालयMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेHealthआरोग्यPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिला