शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दत्तात्रय गाडेचा जामीन अर्ज फेटाळला;स्वारगेट एस.टी. स्थानकातील अत्याचार प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:13 IST

आरोपीने यापूर्वी पीडितेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला असून तो पुन्हा तसे करू शकतो तसेच पीडितेसाठी कोणतीही संरक्षण योजना न्यायालयासमोर सादर करण्यात आलेली नाही.

पुणे : स्वारगेट एस.टी. स्थानकातील बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा जामीन अर्ज सोमवारी न्यायालयाने फेटाळला. गुरूवारी (दि. २६) गाडे याच्या जामीन अर्जावर आरोपी पक्षासह बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावर सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.

न्यायालयीन कोठडी सुनावल्याने येरवडा कारागृहात असलेल्या गाडे याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसार व पीडितेच्या वकील ॲड. श्रीया आवले यांनी विरोध केला. लैंगिक अत्याचार पीडितेच्या इच्छेविरुद्ध व तिच्या संमतीशिवाय केला गेलेला आहे. तपास यंत्रणेचे म्हणणे व आरोपपत्रातील तपशील यांचा संदर्भ देत विशेष सरकारी वकिलांनी असे निर्देशित केले की काही अत्यंत महत्त्वाचे व निर्णायक पुरावे तपासात आले असून, ते आरोपीच्या दोषारोपावर प्रथमदृष्ट्या प्रकाश टाकतात. या पुराव्यांमध्ये विविध पंचनामे, तज्ज्ञांचे अभिप्राय, लोकेशन ट्रेसेस आदींचा समावेश होता जे स्पष्टपणे दर्शवतात. आरोपी व पीडिता यांच्यात पूर्वी कोणताही संपर्क नव्हता व त्यांच्यात कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही.पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले यांनी असा युक्तिवाद केला की, आरोपीने यापूर्वी पीडितेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला असून तो पुन्हा तसे करू शकतो तसेच पीडितेसाठी कोणतीही संरक्षण योजना न्यायालयासमोर सादर करण्यात आलेली नाही. या सर्व बाबींचा विचार करता आरोपीस जामीन दिला जाऊ नये, असा युक्तिवाद केला. तर, आरोपी व पीडिता यांच्यातील लैंगिक संबंध परस्पर संमतीने झालेले आहेत. असे कोणतेही कृत्य घडलेच नाही. आरोपीचे पूर्वीचे गुन्हे हे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराचे नसून, चोरी व दरोड्याचे असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला होता.

स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारीला पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. आरोपी सध्या हा न्यायालयीन कोठडीत असून, त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर गुरुवारी सुनावणी पूर्ण झाली होती.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडswargate bus depotस्वारगेट बसस्थानकPune Crimeपुणे क्राईम बातम्या