शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पुण्यात महिलेला मॅट्रोमोनियल साईटवरून कोटींचा गंडा;पोलिसांनी ठगाला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:11 IST

- पीडित महिला आणि आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय पुणे तसेच भारतातील इतर ठिकाणी एकत्र राहिले.

पुणे - पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या एका महिलेने शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर लग्नासाठी तिचे प्रोफाईल (क्र. SH87341231) तयार केले होते. सन २०२३ मध्ये, डॉ. रोहित ओबेरॉय नावाच्या एका ऑस्ट्रेलियन नागरिकाने (मूळ भारतीय) तिला मेसेज करून ओळख वाढवली. मैत्री झाल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास जिंकला. पीडित महिला आणि आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय पुणे तसेच भारतातील इतर ठिकाणी एकत्र राहिले.पीडित महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून घटस्फोटानंतर ५ कोटी रुपये पोटगी मिळाली होती. ही माहिती आरोपीला कळल्यावर त्याने तिचा गैरफायदा घेतला. पीडित महिला लहान मुलांसाठी 'माइंडफुलनेस अँड स्पिरिच्युअ‍ॅलिटी' (Mindfullness and spirituality) कार्यक्रम घेऊन व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. याचा फायदा घेत आरोपीने तिला हा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी निधी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्याने सिंगापूरमधील इव्हॉन हँन्दयानी आणि विन्सेंट कुआण या व्यक्तींसोबत संगनमत करून पीडितेला सिटी बँक सिंगापूर आणि भारतातील काही बँकांमध्ये वेळोवेळी ३ कोटी ६० लाख १८ हजार ५४० रुपये भरण्यास भाग पाडले.फसवणुकीचा उलगडा आणि आरोपीला अटककाही काळानंतर डॉ. रोहित ओबेरॉय ऑस्ट्रेलियाला गेला आणि पीडितेशी बोलणे टाळू लागला. त्याने आपल्याला तोंडाचा कर्करोग झाला असून तब्येत खालावत असल्याचे भासवून पीडितेशी कायमचा संपर्क तोडला. सप्टेंबर २०२४ मध्ये, त्याचा साथीदार विन्सेंट कुआण याने पीडितेला ईमेल करून डॉ. रोहित ओबेरॉयचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पीडितेने ही बाब तिच्या मैत्रिणीला सांगितल्यावर हा एक प्रकारचा फ्रॉड असू शकतो असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर पीडितेने सर्व गोष्टी पडताळून पाहिल्या असता तिला डॉ. रोहित ओबेरॉय, इव्हॉन हँन्दयानी आणि विन्सेंट कुआण यांनी तिची आर्थिक फसवणूक केल्याची खात्री पटली.तांत्रिक विश्लेषणातून असे निष्पन्न झाले की, पीडितेला फसवणाऱ्या व्यक्तीचे खरे नाव डॉ. रोहित ओबेरॉय नसून अभिषेक शुक्ला असे आहे. तो मूळचा लखनऊचा असून सध्या ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे राहतो. आरोपी परदेशात असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ त्याच्या नावाचे लुक आऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले. २५ जून २०२५ रोजी आरोपी सिंगापूरहून मुंबईला येणार असल्याची माहिती मिळताच, मुंबई विमानतळावर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे.सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरूतपासात असे समोर आले आहे की, आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्लाने shaadi.com वर बनावट प्रोफाईल तयार करून एकूण ३,१९४ महिलांशी संपर्क साधला होता. त्यामुळे सायबर पोलीस या आरोपीने आणखी किती महिलांना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक गंडा घातला आहे, याचा तपास करत आहेत.

अशा मेट्रोमोनियल साइटवर कोणीही बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. - पंकज देशमुख, अपर पोलिस आयुक्त  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड