शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उपचाराऐवजी आधी पैसे भरण्याची अट? गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 20:01 IST

तिला प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्याने त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले

- अश्विनी जाधव केदारीपुणे - पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७)  या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तनिषा या विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या.  मिळालेल्या माहितीनुसार, तनिषा भिसे यांना प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्याने त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी २० लाख रुपयांचा खर्च सांगितला आणि त्यातील १० लाख रुपये तातडीने भरण्याची अट घातली. कुटुंबीयांनी तत्काळ ३ लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, तसेच उर्वरित रक्कम काही वेळाने भरण्याचं आश्वासन दिलं. मात्र, रुग्णालयाने पूर्ण रक्कम भरण्याच्या मागणीवर ठाम राहत, आर्थिक ऐपत नसेल तर ससून रुग्णालयात जावं, असा सल्ला दिला.   या सगळ्या तणावाचा मानसिक परिणाम तनिषा भिसे यांच्यावर झाला. शेवटी नातेवाईकांनी त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवलं. तिथे त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला, मात्र काही वेळानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने आणखी एका रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. तिथे उपचार सुरू असतानाच तनिषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  कुटुंबीयांचे गंभीर आरोपतनिषा यांचा योग्य वेळी उपचार झाला असता तर त्यांचा जीव वाचू शकला असता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी आमदार अमित गोरखे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, 'पैशांअभावी एका गर्भवती महिलेच्या जीवाशी खेळला गेला, ही आरोग्य व्यवस्थेची अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. या प्रकरणी मी विधान परिषदेत आवाज उठवणार आहे'

रुग्णालय प्रशासनाचं स्पष्टीकरणदीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना, 'आम्ही अंतर्गत चौकशी केली असून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करू. असं सांगितलं.सरकारी हस्तक्षेपाची मागणीया प्रकरणानंतर आरोग्य व्यवस्थेतील खासगी रुग्णालयांची मनमानी आणि त्यांच्या व्यापारीकरणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिस आणि आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्या