शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

घरबसल्या कमवा म्हणणारी कंपनी गायब;ई-बाईकच्या आमिषाने २००० नागरिकांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:09 IST

पार्ट टाईम काम करा, घरी बसून पैसे कमवा आणि ई-बाईक मिळवा” या गोडगोड आश्वासनाच्या आमिषाने पुण्यात तब्बल २००० नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे -  पार्ट टाईम काम करा, घरी बसून पैसे कमवा आणि ई-बाईक मिळवा” या गोडगोड आश्वासनाच्या आमिषाने पुण्यात तब्बल २००० नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  शुशको युनिकॉर्न (Shushko Unicorn) नावाच्या कंपनीने पार्ट टाईम जॉबसाठी नागरिकांना आकर्षित करत त्यांच्या नावावर कर्ज उभं केलं आणि त्यानंतर ना पगार दिला ना ई-बाईक. स्वारगेट पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, फसवणूक झालेल्या अनेक तक्रारदारांनी आज पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने त्यांना सांगितले की, त्यांच्या ई-बाईकच्या मार्केटिंगसाठी पार्ट टाईम काम दिलं जाईल. यासाठी फक्त नाव, कागदपत्रं आणि बँक तपशील आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याच नावावर कर्ज काढण्यात आलं आणि बाईक न देता नागरिकांना थेट थकबाकीदार बनवण्यात आलं.या फसवणुकीमुळे अनेकांच्या CIBIL स्कोअरवरही परिणाम झाला असून, भविष्यात कर्ज मिळवणं कठीण होण्याची भीती या नागरिकांनी व्यक्त केली आहे. “आमचं नुकसान मोठं झालं आहे. कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. आता बँकांच्या नोटीस येऊ लागल्या आहेत. आम्हाला आमचे पैसे परत मिळावेत आणि या कंपनीवर कडक कारवाई व्हावी,” अशी मागणी फसवणूकग्रस्तांनी केली आहे.पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, या प्रकारामागे आणखी कोणी आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अशा आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसPune Crimeपुणे क्राईम बातम्या