Video : एसटी चालक, वाहक तसेच प्रवाशांना मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:07 IST2025-12-10T10:05:54+5:302025-12-10T10:07:11+5:30
अवसरी फाटा येथे थार गाड्याच्या चालकाबरोबर भांडणे का केली यावरून माशेरे बंधूंनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली.

Video : एसटी चालक, वाहक तसेच प्रवाशांना मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल
मंचर : मंचर पोलिस ठाण्यात एसटीच्या चालक, वाहक तसेच प्रवाशांना मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे प्रदीप दत्तात्रेय माशेरे आणि सिद्धेश दत्तात्रेय माशेरे (दोघे रा. मंचर) अशी आहेत.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेल एसटी आगाराचे चालक भरत पांडुरंग बुगदे यांनी फिर्याद दिली आहे की, मंचर एसटी बस स्थानकात प्रदीप दत्तात्रेय माशेरे व सिद्धेश दत्तात्रेय माशेरे यांनी एसटीचे चालक भरत बुगदे, वाहक अमित अरुण करपे आणि बसमधील एका प्रवाशाला मारहाण केली.
पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बसमध्ये गुंडगिरी ! चालक–कंडक्टरला मारहाण, प्रवाशांमध्ये दहशत
— Lokmat (@lokmat) December 5, 2025
पुणे–नाशिक महामार्गावर चालत्या एसटी बसमध्ये दोन तरुणांनी निर्माण केलेल्या गोंधळामुळे प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला. खेड–मंचर मार्गावर ही धक्कादायक घटना घडली असून मारहाणीचा… pic.twitter.com/6H3A2y8yIq
अवसरी फाटा येथे थार गाड्याच्या चालकाबरोबर भांडणे का केली यावरून माशेरे बंधूंनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. त्यानंतर एसटी बस नेहमीप्रमाणे चालवायची नाही म्हणून बस थांबवून ठेवून सरकारी कामात अडथळा आणला. एसटी चालक भरत बुगदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप दत्तात्रेय माशेरे व सिद्धेश दत्तात्रेय माशेरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार कीरवे करत आहेत.