Pune Crime: पुण्यात भोंदू बाबाचा धक्कादायक कारनामा; ‘दोष निवारण’च्या नावाखाली महिलांचे शोषण

By किरण शिंदे | Updated: April 2, 2026 12:50 IST2026-04-02T12:49:27+5:302026-04-02T12:50:36+5:30

Pune crime breaking news- शिवदत्त आश्रम येथे ‘महाराज’ म्हणून वावरणाऱ्या नवनाथ गवळी या कथित भोंदू बाबाविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Pune crime breaking news Shocking act of fraudster in Pune; Exploitation of women in the name of 'redressing grievances' | Pune Crime: पुण्यात भोंदू बाबाचा धक्कादायक कारनामा; ‘दोष निवारण’च्या नावाखाली महिलांचे शोषण

Pune Crime: पुण्यात भोंदू बाबाचा धक्कादायक कारनामा; ‘दोष निवारण’च्या नावाखाली महिलांचे शोषण

पुणे - पुणे जिल्ह्यातील खेड तालुका येथील चांडोली गावात अध्यात्माच्या आड महिलांचे कथित शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवदत्त आश्रम येथे ‘महाराज’ म्हणून वावरणाऱ्या नवनाथ गवळी या कथित भोंदू बाबाविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पीडित महिलेने राजगुरुनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून, ‘दोष निवारण’च्या नावाखाली आरोपीकडून महिलांकडे अयोग्य मागण्या केल्या जात असल्याचा आरोप आहे. तसेच विनयभंग आणि मानसिक छळ केल्याचेही पीडितेने नमूद केले आहे.
 
अधिकच्या माहितीनुसार, सुरुवातीला भीती आणि सामाजिक दबावामुळे तक्रार दडपून ठेवण्यात आली होती. मात्र, वाढत्या अत्याचारामुळे अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सदर प्रकरणात गुन्हा दाखल असूनही आरोपी नवनाथ गवळी अद्याप फरार असल्याने स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या कारवाईच्या गतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.

Web Title : पुणे: ढोंगी बाबा ने 'उपाय' के नाम पर महिलाओं का शोषण किया

Web Summary : पुणे के खेड़ तालुका में एक स्वयंभू बाबा पर 'उपाय' के नाम पर आश्रम में महिलाओं का यौन शोषण करने का आरोप है। एक पीड़िता ने छेड़छाड़ और मानसिक उत्पीड़न का आरोप लगाते हुए पुलिस में शिकायत दर्ज कराई है। आरोपी फरार है, जिससे जनता में आक्रोश है और पुलिस की धीमी प्रतिक्रिया पर सवाल उठ रहे हैं।

Web Title : Pune: Fake Baba Exploits Women Under Guise of 'Remedy'

Web Summary : A self-proclaimed godman in Pune's Khed taluka is accused of sexually exploiting women at his ashram under the pretext of 'remedy'. A victim filed a police complaint alleging molestation and mental harassment. The accused is absconding, sparking public outrage and questions about the slow police response.