शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Pune Crime : काळा रंगाची मोटरसायकल,निळ्या रंगाचे जॅकेट; दरोडेखोरांचा फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:38 IST

सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील ‘गजानन ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर चार अज्ञात  दरोडेखोरांनी  भरदिवसा कोयत्याने हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला.

पुणे : शहरातील सुरक्षेच्या दाव्यांना धक्का देणारी घटना आज (दि. ० १) मंगळवारी दुपारी घडली. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील ‘गजानन ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर चार अज्ञात  दरोडेखोरांनी   भरदिवसा कोयत्याने हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला. या हल्ल्यात दुकानमालक आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सकाळी ११ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरोडेखोरांनी थेट दुकानात शिरून, काहीही न बोलता कोयत्याने सपासप वार करत दुकानातील लोकांना जखमी केले. त्यानंतर दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज उचलून ते पसार झाले. समोर आलेल्या माहितीनुसार या  दरोडेखोरांचा फोटो समोर आला आहे.

समोर आलेल्या फोटोत सदर गाडीवरील इसम हे गजानन ज्वेलर्स या दुकानातून दरोडा टाकून वडगावच्या दिशेने रवाना झालेले आहेत. सदर मोटरसायकल ही काळा रंगाची असून त्यावर तीन इसम असून पुढे बसलेले इसमाने निळ्या रंगाचे जॅकेट व ग्रे कलरची पॅन्ट व मागे बसलेल्या इसमाने गुलाबी रंगाची हुडी व ब्लॅक रंगाची पॅन्ट परिधान केलेले आहे.सदर गाडी मिळवताच त्याचप्रमाणे इसम मिळवताच ताब्यात घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहे.  तत्पूर्वी, घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु, या घटनेनंतर नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. भरदिवसा, मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानात दरोडा पडतो, आणि पोलिसांना याची खबर लागते तेव्हा सगळं उरकून दरोडेखोर पसार होतात, ही बाब गंभीर आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केल्याचा दावा केला असला, तरी दरवाढती गुन्हेगारी आणि दिवसाढवळ्या अशा घटनांनी पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या