शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गीता जयंती २०२५: कालातीत अमृत, उपनिषदांचा मान; शाश्वत मूल्यांचा कल्पतरू श्रीमद्‌ भगवद्‌गीता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 16:57 IST

Geeta Jayanti 2025: गीतेतून सातत्याने नवीन काहीतरी मिळत असल्यामुळे याची कालातीतता स्पष्ट होते.

Gita Jayanti 2025: सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने अजुर्नाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. याच दिवशी गीता जयंती असते. सोमवार, ०१ डिसेंबर २०२५ रोजी मोक्षदा एकादशी आहे. याच दिवशी गीता जयंती आहे. गीता जयंतीचा उत्सव अगदी देशभर साजरा केला जातो. या दिवशी भगवद्गीतेचे पठण केले जाते. बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग याची आदर्श शिकवण देणाऱ्या श्रीकृष्णाचे स्मरण केले जाते. 

प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदांचे मान मिळाला आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले असून, जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष असून, गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अजुर्नाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन प्रयास केला आहे.  तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे, ही कदाचित अखिल विश्वात गीतेची आगळीवेगळी विशेषता आणि महानता दिसून येते,  गीता ही सर्व शास्त्रमयी आहे. गीतेत सर्व शास्त्रांचा समन्वय पहायला मिळतो. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता हा आमचा विश्व धर्मग्रंथ आहे. भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते. 

गीता हा वैश्विक ग्रंथ, तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग 

भगवद्‌गीतेचे १८ अध्याय, ७०० श्लोक आहेत. भगवद्गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. गीता जयंतीला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते.  

गीता जयंतीच्या दिवशी श्रीकृष्ण पूजन

मार्गशीर्ष एकादशीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. तेव्हापासून या दिवशी गीता जयंती साजरी केली जाऊ लागली. गीता जयंतीच्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. गीता जयंतीला गीता पठण केल्याने जीवनात सुख-शांती येते, असे मानले जाते. वेदान्ताची उपनिषदे, भगवद्‌गीता आणि ब्रह्मसूत्रे ही प्रस्थानत्रयी मानली आहे. भगवद्‌गीतेची आजवर उपलब्ध असलेली सर्वांत प्राचीन व अधिकृत प्रत म्हणजे शंकराचार्यांचे गीताभाष्य ही होय. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते अगदी लोकमान्य टिळक यांच्यापर्यंत अनेकांनी गीतेवर भाष्य केले आहे. आजच्या काळातही गीतेवर अभ्यास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गीतेतून सातत्याने नवीन काहीतरी मिळत असल्यामुळे याची कालातीतता स्पष्ट होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Gita Jayanti 2025: Celebrating Timeless Wisdom and Eternal Values

Web Summary : Gita Jayanti, on December 1, 2025, marks the day Krishna imparted life lessons to Arjuna. The Bhagavad Gita, a treasure of knowledge, provides courage and illuminates life's purpose. Its teachings offer a path to a happy, peaceful existence, making it a globally revered scripture.
टॅग्स :MahabharatमहाभारतLord Shivaमहादेवspiritualअध्यात्मिक