Video : पुण्यात कॉलेज कॅम्पसमध्ये गोंधळ; लेकीचा छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला पित्याचा चोप

By किरण शिंदे | Updated: March 5, 2026 11:25 IST2026-03-05T11:25:15+5:302026-03-05T11:25:31+5:30

- संबंधित तरुणीला एका विद्यार्थ्याकडून गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन माध्यमातून त्रास दिला जात होता.

Pune Crime Angry father beats up student who harassed his daughter online on college campus; Pune incident in discussion | Video : पुण्यात कॉलेज कॅम्पसमध्ये गोंधळ; लेकीचा छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला पित्याचा चोप

Video : पुण्यात कॉलेज कॅम्पसमध्ये गोंधळ; लेकीचा छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला पित्याचा चोप

पुणे - पुण्यातील एका खासगी महाविद्यालयात मुलीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला तिच्या संतप्त पित्याने कॉलेज कॅम्पसमध्येच जाब विचारत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची शहरभर चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीला एका विद्यार्थ्याकडून गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन माध्यमातून त्रास दिला जात होता. वारंवार मेसेज पाठवणे, संपर्क करण्याचा प्रयत्न करणे आणि सोशल मीडियावरून पाठपुरावा करणे असा प्रकार जवळपास १५ दिवसांपासून सुरू असल्याचा तरुणीचा आरोप आहे. या सततच्या छळामुळे ती मानसिक तणावात असल्याचेही सांगितले जाते. 

या प्रकाराला कंटाळून अखेर तरुणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर संबंधित विद्यार्थी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आल्याची माहिती मिळताच तिचे वडील तिथे पोहोचले. त्यांनी त्या विद्यार्थ्याला गाठून जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर झटापटीत झाले. संतापलेल्या पित्याने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, या घटनेनंतर काही काळ महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

पीडित कुटुंबीयांनी यापूर्वीच या प्रकाराबाबत महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार केल्याचा दावा केला आहे. मात्र इतके दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे हा प्रकार घडल्याचेही त्यांनी सांगितले.  या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title : पुणे: कॉलेज में बेटी को छेड़ने पर पिता ने छात्र को पीटा

Web Summary : पुणे में, एक पिता ने कॉलेज परिसर में अपनी बेटी को ऑनलाइन परेशान करने के आरोप में एक छात्र की पिटाई कर दी। वीडियो में कैद घटना से परिसर में तनाव फैल गया। परिवार का दावा है कि पहले शिकायत करने के बावजूद कॉलेज प्रशासन ने कोई कार्रवाई नहीं की, जिससे छात्रों की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है।

Web Title : Pune: Father Assaults Student for Harassing Daughter in College Campus

Web Summary : In Pune, a father confronted and assaulted a student in college for allegedly harassing his daughter online. The incident, captured on video, sparked campus tension. The family claims inaction by college authorities despite prior complaints, raising student safety concerns.