वेडीवाकडी दुचाकी चालवू नका’ सांगितल्याचा संताप; मोटारचालकाला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 10:23 IST2025-08-28T10:22:36+5:302025-08-28T10:23:26+5:30
या मारहाणीत एकाने भार्गव यांच्या नाकावर हातातील कडे मारले. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. भार्गव यांच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

वेडीवाकडी दुचाकी चालवू नका’ सांगितल्याचा संताप; मोटारचालकाला बेदम मारहाण
पुणे : वेडीवाकडी दुचाकी चालवू नका, असे म्हटल्याच्या रागातून दुचाकीवरील दोघांनी एका मोटार चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास खडकी परिसरात घडली.
याप्रकरणी खडकी पोलिसांनी दुचाकीस्वार व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सत्यम सुखसागर भार्गव (वय २९, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सत्यम भार्गव हे २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास खडकीतील गुरुद्वारा रस्त्याने निघाले होते. दोघे वेडीवाकडी दुचाकी चालवत होते. त्यांना सत्यम भार्गव म्हणाले, वेडवाकडी दुचाकी चालवू नका. या कारणावरून दुचाकीस्वार आणि साथीदारांनी भार्गव यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
या मारहाणीत एकाने भार्गव यांच्या नाकावर हातातील कडे मारले. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. भार्गव यांच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी भार्गव यांच्याबरोबर असलेल्या मित्राला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर दुचाकीस्वार आणि साथीदार तेथून पसार झाले. मारहाणीत भार्गव यांचा खांदा निखळला. पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.