शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला समक्ष भेटण्यास परवानगी द्या;आरोपीच्या वकिलाचा न्यायालयात अर्ज

By नम्रता फडणीस | Updated: March 22, 2025 16:01 IST

- आरोपीच्या वकिलाचा न्यायालयात अर्ज : २४ तारखेला सुनावणी

पुणे :स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला समक्ष भेटण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज त्याचे वकील अॅड. वाजीद खान (बिडकर) यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. यावर सोमवारी (दि.२४) सुनावणी होणार आहे.स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी गाडे याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहे. तेथे वकिलाला इतर आरोपींप्रमाणे त्याच्याशी फोनवरूनच बोलावे लागते. मात्र, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. घटनेचे माध्यमांधे उमटलेले पडसाद, फोनवर बोलताना इतर आरोपी, पोलीस उपस्थित असतात. त्यामुळे तो मानसिक विवेचनातून जात आहे. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेण्यास परवानगी देण्याची मागणी, अॅड. वाजीद खान (बिडकर) यांनी अर्जातून केली आहे.तत्पूर्वी, स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून गाडे या नराधमाने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. गाडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्याला पोलिसांच्या कामकाजाबाबत माहिती असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत असल्याची चर्चा शहरात होती. घटनेनंतर आरोपी शिरुरमध्ये लपून बसल्याची माहिती समोर आली. त्यांनतर त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, तसेच स्वारगेट पोलिसांनी १३ पथके शिरूरला रवाना झाली.  अखेर ७२ तासांच्या कालावधीनंतर गाडेला शोधण्यात यश आले. आता या नराधमावर लवकरात लवकर कारवाई करत कठोर शिक्षा करावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत होती. पुणे पोलिसांकडून विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली होती. अखेर राज्य शासनाकडून या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटकPoliceपोलिसswargate bus depotस्वारगेट बसस्थानकswargateस्वारगेटPune Crimeपुणे क्राईम बातम्या