उरळीकांचन - गुढीपाडव्याच्या दिवशी सोडतापवाडी फाट्यावर एका मोठ्या बलकरचा भीषण अपघात झाला. हडपसरहून उरळीकांचनच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बलकर सरळ एका चारचाकी गॅरेजवर जाऊन चढला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या मारुती एर्टिगा आणि अन्य दोन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ऐन गुढीपाडव्याला सोडतापवाडी फाट्यावर अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 16:53 IST