जुन्या वादातन एकाचा डोक्यात पाठीवर गोळ्या घालून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:56 IST2025-11-28T11:55:31+5:302025-11-28T11:56:22+5:30
जुन्या वादातून एका तरुणाचा डोक्यात, पाठीत पिस्तुलातून गोळ्या घालून खून केल्याची घटना (दि. २७) घडली

जुन्या वादातन एकाचा डोक्यात पाठीवर गोळ्या घालून खून
राजगुरुनगर : जुन्या वादातून एका तरुणाचा डोक्यात, पाठीत पिस्तुलातून गोळ्या घालून खून केल्याची घटना (दि. २७) घडली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव केतन शामराव कारले (वय २३, रा. चांदुस, ता. खेड) आहे. या घटनेबाबत त्याची पत्नी कुंकुम केतन कारले यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम संतोष तांबे (रा. आसखेड, ता. खेड) यांचा मयत केतन कारले यांच्याशी जुना वाद होता. दि. २७ रोजी सकाळी साडेपाच वाजता मृत केतन कारले आणि त्यांची पत्नी कुंकुम केतन कारले राजगुरुनगर येथे कोर्टाच्या कामासाठी दुचाकीवर जात होते.
त्यावेळी ठाकूर पिंपरी (ता. खेड) कोळेकर वस्तीच्या शेजारून शुभम संतोष तांबे आणि त्याचे दोन साथीदारांनी केतन कारले याला रस्त्यावर एकटे आढळल्यावर शुभम तांबे यांनी पिस्तुलने डोक्यात, पायात आणि पाठीवर गोळी झाडून त्याचा खून केला. शुभम संतोष तांबे आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात (त्यांचे नावे आणि पत्ते अजून मिळालेली नाहीत) खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण करत आहेत.