टोळक्यासोबत डान्स अन् पैशांची उधळण करणाऱ्या कुख्यात टिपू पठाणवर अखेर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:39 IST2025-04-03T14:33:23+5:302025-04-03T14:39:16+5:30

टोळक्यासह नोटा उडवत नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

pune crime A case has finally been registered against notorious gangster Tipu Pathan | टोळक्यासोबत डान्स अन् पैशांची उधळण करणाऱ्या कुख्यात टिपू पठाणवर अखेर गुन्हा दाखल

टोळक्यासोबत डान्स अन् पैशांची उधळण करणाऱ्या कुख्यात टिपू पठाणवर अखेर गुन्हा दाखल

पुणे सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गुंड टिपू पठाण हा नोटा उडवत असल्याचं दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला टोळक्यांची गर्दी बघायला मिळत आहे. या व्हिडिओत टिपू नोटा उडवत डान्स देखील करत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळे दहशद निर्माण झाली आहे.  

दरम्यन, या व्हिडिओची काळेपडळ पोलिसांनी दाखल घेत कुख्यात गुंड टिपू पठाणवर खंडणी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याचा भाऊ एजाज पठाण याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.  



काही दिवसांपूर्वी टिपू पठाणचा एका कार्यक्रमात टोळक्यासह नोटा उडवत नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात अधिक तपास सुरू केला.  टिपू पठाण याच्यावर यापूर्वीही खूनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर जमिनी ताब्यात घेण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुण्यातील गुन्हेगारी जगतात त्याचे मोठे वर्चस्व असल्याचे बोलले जाते. सध्या पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: pune crime A case has finally been registered against notorious gangster Tipu Pathan