Pune Crime: घरात झोपलेल्या १९ वर्षांच्या तरुणीवर सावत्र मामाचा बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 13:45 IST2022-09-13T13:44:13+5:302022-09-13T13:45:02+5:30
३० वर्षांच्या सावत्र मामाला अटक

Pune Crime: घरात झोपलेल्या १९ वर्षांच्या तरुणीवर सावत्र मामाचा बलात्कार
पुणे : घरात झोपलेल्या १९ वर्षांच्या तरुणीवर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवणाऱ्या व घरातील लोकांना जिवे मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या सावत्र मामाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका १९ वर्षांच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ३० वर्षांच्या सावत्र मामाला अटक केली आहे. ही घटना मार्च २०२२ मध्ये घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा सावत्र मामा आहे. फिर्यादी या घरी झोपलेल्या असताना त्यांच्या घरात येऊन सावत्र मामाने त्यांच्याशी मनाविरुद्ध शरीर संबंध ठेवले. फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता आरोपीने फिर्यादीस कोणाला काही सांगितल्यास घरातील लोकांना मारून टाकण्याची धमकी दिली.
त्यामुळे घाबरून त्यांनी त्यावेळी तक्रार केली नव्हती. त्यानंतर तो तिला वारंवार धमकावत असल्याने शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.