पप्पी दे..! ७३ वर्षीय वृद्धाकडून रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग;गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 12:57 IST2025-07-06T12:49:00+5:302025-07-06T12:57:47+5:30
घाबरलेली तरुणी तात्काळ क्लिनिकमधून बाहेर पडली, मात्र आरोपीने तिचा पाठलाग करत पुन्हा त्रास दिला. या प्रकारामुळे मानसिक धक्क्यात आलेल्या पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पप्पी दे..! ७३ वर्षीय वृद्धाकडून रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग;गुन्हा दाखल
पुणे : विश्रामबाग रोड परिसरातील एका खासगी क्लिनिकमध्ये २७ वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी ७३ वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेशचंद चोरडिया असे आरोपीचे नाव असून, त्याने क्लिनिकमध्ये एकटी असलेल्या तरुणीच्या गालाला हात लावून “पप्पी दे” अशी अश्लील मागणी केली. त्यानंतर पैशांचे आमिष दाखवत हॉटेलमध्ये जेवायला नेण्याची व मनासारखे करण्याची विकृत ऑफर दिली.
या प्रसंगामुळे घाबरलेली तरुणी तात्काळ क्लिनिकमधून बाहेर पडली, मात्र आरोपीने तिचा पाठलाग करत पुन्हा त्रास दिला. या प्रकारामुळे मानसिक धक्क्यात आलेल्या पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सुरेशचंद चोरडिया याच्यावर विनयभंग, महिलेला मानसिक त्रास देणे व अश्लील प्रस्ताव देण्याचे गुन्हे दाखल केले असून, तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजचीही पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.