पुण्यातील कर्व रोडवर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये काही गुंड घुसतात. हातात कोयते आणि तोंड झाकलेली... तोडफोड करतच गुंड काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीजवळ जातात आणि कोयते दाखवतात. त्यानंतर जे घडत ते थरकाप उडवणारं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली जात असून, पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे. पुण्यात एका रेस्टॉरंटवरच दरोडा टाकण्यात आला. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढवली गेली आहे. २४ तास पोलीस मदतही सुरू करण्यात आली आहे, अशातही ही घटना घडल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोयते उगारले, सगळे पैसे घेतले
आरोपी रेस्टॉरंटमध्ये आल्यापासून ते परत जाईपर्यंतचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. काही गुंड हातात कोयते घेऊन रेस्टॉरंटमध्ये घुसतात. त्यानंतर दरवाज्यातील काही वस्तूंची तोडफोड करतात.
दोन-तीन कोयता असलेले आरोपी काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीकडे येतात. त्याला कोयता दाखवतात. दुसरा आरोपी काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीच्या गळ्यापर्यंत कोयता घेऊन येतो. काऊंटरवर बसलेला व्यक्ती त्यांना पैसे देतो. सगळे पैसे घ्या, असा इशारा करताना दिसत आहे.
आरोपी सगळे पैसे घेतात. एक आरोपी रेस्टॉरंटमधील साहित्याची नासधूस करतो. त्यानंतर तिन्ही आरोपी निघून जातात.
कर्वे रोडवरील रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांची २४ तास गस्त असतानाही अशा प्रकारे घटना घडत असून, पोलिसांचा धाक संपत चाललाय की काय? या चर्चेला तोंड फुटले आहे.
Web Summary : Gangs wielding sickles terrorized a Pune restaurant, stealing cash and vandalizing property. The brazen act, caught on CCTV, raises concerns about rising crime despite increased police presence.
Web Summary : पुणे में हंसिया लहराते हुए एक गिरोह ने एक रेस्टोरेंट में आतंक मचाया, नकदी लूटी और संपत्ति को नुकसान पहुंचाया। सीसीटीवी में कैद इस दुस्साहसिक घटना ने बढ़ी हुई पुलिस उपस्थिति के बावजूद बढ़ते अपराधों के बारे में चिंताएं बढ़ा दी हैं।