Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:49 IST2025-11-19T13:46:40+5:302025-11-19T13:49:40+5:30
Pune Crime Video: पुण्यातील एका रेस्टॉरंटमधील व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे. काही गुंडांनी एका रेस्टॉरंटमध्ये नंगे कोयते नाचवत दरोडा टाकला.

Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
पुण्यातील कर्व रोडवर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये काही गुंड घुसतात. हातात कोयते आणि तोंड झाकलेली... तोडफोड करतच गुंड काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीजवळ जातात आणि कोयते दाखवतात. त्यानंतर जे घडत ते थरकाप उडवणारं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली जात असून, पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे. पुण्यात एका रेस्टॉरंटवरच दरोडा टाकण्यात आला. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढवली गेली आहे. २४ तास पोलीस मदतही सुरू करण्यात आली आहे, अशातही ही घटना घडल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोयते उगारले, सगळे पैसे घेतले
आरोपी रेस्टॉरंटमध्ये आल्यापासून ते परत जाईपर्यंतचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. काही गुंड हातात कोयते घेऊन रेस्टॉरंटमध्ये घुसतात. त्यानंतर दरवाज्यातील काही वस्तूंची तोडफोड करतात.
दोन-तीन कोयता असलेले आरोपी काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीकडे येतात. त्याला कोयता दाखवतात. दुसरा आरोपी काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीच्या गळ्यापर्यंत कोयता घेऊन येतो. काऊंटरवर बसलेला व्यक्ती त्यांना पैसे देतो. सगळे पैसे घ्या, असा इशारा करताना दिसत आहे.
आरोपी सगळे पैसे घेतात. एक आरोपी रेस्टॉरंटमधील साहित्याची नासधूस करतो. त्यानंतर तिन्ही आरोपी निघून जातात.
पुण्यात कोयत्याची दहशत कायम... हातात कोयते घेऊन एका टोळक्याने कर्वे रोडवरील एका रेस्टॉरंट बार मधे रात्री 1.30 च्या सुमारास दरोडा टाकला.. पुण्यात मोठा गाजावाजा करत cop 24 हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. 24 तास विशेष गस्त घालणारे Cop 24 कुठे आहेत ?@Dev_Fadnavis@PuneCityPolicepic.twitter.com/q9WeIp1bfN
— Archana More-Patil (@Archana_Mirror) November 19, 2025
कर्वे रोडवरील रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांची २४ तास गस्त असतानाही अशा प्रकारे घटना घडत असून, पोलिसांचा धाक संपत चाललाय की काय? या चर्चेला तोंड फुटले आहे.