४८ कोटींचा जीएसटी घोटाळ्याचा आरोप असलेल्याला जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:33 IST2025-07-09T17:32:54+5:302025-07-09T17:33:29+5:30
जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एल. टिकले यांनी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

४८ कोटींचा जीएसटी घोटाळ्याचा आरोप असलेल्याला जामीन
पुणे : बनावट कंपनी भासवून बिले दाखल करून शासनाची ४८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एल. टिकले यांनी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
मे.ओम असोसिएट्सचे मालक ऋतुराज शिवाजी माने-देशमुख असे जामीन झालेल्याचे नाव आहे. त्याने अॅड. अभिषेक राजेंद्र अवचट यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. अवचट यांना अॅड. विराज पाटोळे, अॅड. महेश सदाफळे आणि अॅड. स्वराज पाटोळे यांनी सहाय्य केले.
माने-देशमुख याच्यावर जीएसटी अॅक्टच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल आहे. अॅड. अवचट यांनी युक्तिवाद केला की, या गुन्ह्यात केलेली अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आरोपीला अटक करताना जीएसटी कायद्यातील अटके संदर्भातील निर्देशांची पायमल्ली करण्यात आली आहे.