शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पुणे शहराला एकही मंत्रिपद नाही;राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी घोर निराशा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 3:35 PM

राज्यात भाजपची सत्ता असताना पुणे शहराला गिरीश बापट व दिलीप कांबळे यांच्या रूपाने दोन मंत्रिपदे

ठळक मुद्देराज्यमंत्री पदासाठी आमदार चेतन तुपे तसेच सुनील टिंगरे यांचे नाव होते़ चर्चेत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराला एखादे राज्यमंत्री पद तरी मिळेल, या आशेवर असलेल्या शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी घोर निराशा आली आहे़. राज्यमंत्री पदासाठी आमदार चेतन तुपे तसेच सुनील टिंगरे यांचे नाव चर्चेत होते़. राज्यात भाजपची सत्ता असताना पुणे शहराला गिरीश बापट व दिलीप कांबळे यांच्या रूपाने दोन मंत्रिपदे मिळाली होती़. तर याचदरम्यान झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवित ९९ जागांवर विजय संपादन केला़. मात्र, आता चार सदस्यांचा प्रभाग रद्द होऊन वार्ड पद्धती येणार असल्याने, येत्या महापालिका निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने मोर्चेबांधणी केली जात आहे़. निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी व विधानसभा निवडणुकीत शहरात राष्ट्रवादीला मिळालेले मताधिक्क्य लक्षात घेता, एखादे तरी राज्यमंत्रिपद मिळेल, अशी आशा शहर पदाधिकाऱ्यांची होती. परंतु या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे शहराला एकही मंत्रिपद मिळाले नाही़ ..... पुणे शहराला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा नव्हती़. त्यामुळे आम्हाला याचे दु:ख नाही; परंतु जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळाले याचा जास्त आनंद आहे़. ......पुण्याच्या प्रश्नांची जाण असलेले अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने आता प्रलंबित विकास कामे लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्यक्त केला....निवडणुकीला आणखी पावणेदोन वर्षे आहेत, त्यामुळे आघाडी सरकारच्या माध्यमातून पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचे प्राधान्य राहणार असल्याचेही ते म्हणाले़. .....पर्वतीमध्ये आनंदोत्सव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पर्वती मतदारसंघाच्या वतीने अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी अध्यक्ष नितीन कदम, नगरसेविका अश्विनी कदम, प्रिया गदादे, डॉ. सुनीता मोरे, श्वेता होनराव-कामठे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेChetan Tupeचेतन तुपेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा