pune Breaking : A fire in the ICU department of Sardar Vallabhbhai Patel Hospital in the cantonment area of Pune | Pune Breaking : पुण्यात कॅंटोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग 

Pune Breaking : पुण्यात कॅंटोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग 

पुणेपुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या लवकरच अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आगीची घटना शनिवारी(दि.५)  सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. या आगीची माहिती मिळताच पुणे व कॅंटोन्मेंट अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर काही वेळेतच अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पुणे कॅम्प परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे आग लागली. रुग्णालयाच्या आयसीयू विभागातच आग लागल्याने रुग्णालय व्यवस्थापन यंत्रणेची त्यामुळे चांगलीच पळापळ झाली. या आगीची तात्काळ माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना व नुकसान टळले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर थोड्याच वेळात रुग्णालयाची सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा सेवा पूर्ववत सुरु करण्यात आली. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pune Breaking : A fire in the ICU department of Sardar Vallabhbhai Patel Hospital in the cantonment area of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.