देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ‘भीमाशंकर’ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 17:05 IST2025-03-23T17:03:48+5:302025-03-23T17:05:45+5:30
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात.

देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ‘भीमाशंकर’ला
पुणे : भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला. पुरस्कारांचे वितरण केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. कारखान्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (ता. २२) पत्रकार परिषदेमध्ये या पुरस्कारांची घोषणा केली. संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यावेळी उपस्थित होते.
अन्य पुरस्कार याप्रमाणे :
उत्कृष्ट ऊस उत्पादक प्रथम: विघ्नहर सहकारी साखर कारखाना ता. जुन्नर. द्वितीय: डॉ. जी. डी. बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखाना, सांगली. तृतीय :श्री महुवा प्रदेश सहकारी खांड उद्योग (सुरत).
संघाच्या २५ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक १० साखर कारखाने आहेत.
अन्य पुरस्कार याप्रमाणे : विविध विभागनिहाय पुरस्कार, तांत्रिक क्षमता गट - प्रथम - यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (कराड, जि.सातारा). द्वितीय - कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना (श्रीपूर, सोलापूर). तृतीय - डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना (वांगी, जि. सांगली).
उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन पुरस्कार : प्रथम- कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना (जालना)
द्वितीय - श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी (भरूच, गुजरात). तृतीय - श्री. नर्मदा खांडसरी उद्योग सहकारी मंडळी (नर्मदा, गुजरात)
विक्रमी ऊस गाळप विभाग : प्रथम - विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना (सोलापूर).
विक्रमी साखर उतारा : प्रथम-कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना (कोल्हापूर). उच्च साखर उतारा अत्युत्कृष्ट साखर कारखाना : श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (बारामती).
उर्वरित विभाग याप्रमाणे आहेत. उत्कृष्ट ऊस उत्पादकता : प्रथम - बुधेवाल सहकारी शुगर मिल्स (लुधियाना, पंजाब), द्वितीय-कल्लाकुरिची कॉपरेटिव्ह शुगर (विल्लुपुरम, तामिळनाडू), तृतीय - किसान सहकारी साखर कारखाना (शहाजहांपूर, उत्तर प्रदेश).
तांत्रिक कार्यक्षमता : प्रथम - करनाल सहकारी साखर कारखाना (करनाल, हरयाणा), द्वितीय- चेय्यार सहकारी साखर कारखाना (तिरुवन्नमलै, तामिळनाडू). तृतीय - किसान सहकारी साखर कारखाना (आझमगढ, उत्तर प्रदेश)
उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन : प्रथम - नवलसिंह सहकारी साखर कारखाना (बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश). द्वितीय - चेंगलरायन सहकारी साखर कारखाना (विल्लूपुरम, तामिळनाडू). तृतीय - धर्मापुरी डिस्ट्रिक्ट सहकारी साखर कारखाना (धर्मापुरी, तामिळनाडू).
विक्रमी ऊस गाळप : प्रथम - रमाला सहकारी साखर कारखाना (बागपत, उत्तर प्रदेश),
विक्रमी साखर उतारा : प्रथम - किसान सहकारी साखर कारखाना (बागपत, उत्तर प्रदेश).
उर्वरित विभागातील अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना : सुब्रनिया शिवा सहकारी साखर कारखाना (धर्मापुरी, तामिळनाडू).