पुणे हाेतंय चहाचं कॅपिटल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 09:05 PM2019-01-30T21:05:29+5:302019-01-30T21:07:24+5:30

सध्या पुण्याचं चित्र पाहिलं तर पुणे आता एक प्रकारे चहाचं कॅपिटल हाेत आहे.

Pune is become tea capital | पुणे हाेतंय चहाचं कॅपिटल

पुणे हाेतंय चहाचं कॅपिटल

googlenewsNext

पुणे : चहाशिवाय अनेकांची सकाळ हाेत नाही. चहा हा आपल्या आयुष्यात एक अविभाज्य घटक झाला आहे. कट्ट्यावरच्या गप्प्यांची सुरुवात चहाच्या घाेटानेच हाेत असते. सध्या पुण्याचं चित्र पाहिलं तर पुणे आता एक प्रकारे चहाचं कॅपिटल हाेत आहे. सध्या पुण्यात चहाचं ब्रॅडिंग करण्यात येत असून चहाची दुकानं आता सुसज्ज आणि आकर्षक हाेत आहेत. 
 
काही महिन्यांपूर्वी पुण्यातील येवले चहा प्रकाशझाेतात आला हाेता. त्यानंतर येवले चहाच्या अनेक शाखा पुण्यात सुरु झाल्या. पुणे शहरंच काय तर पुणे जिल्ह्यात येवले चहा जाऊन पाेहाेचला. त्यानंतर पुण्यात चहाला एक ग्लॅमर येण्यास सुरु झाली. जुने अमृतुल्य देखील आकर्षक हाेऊ लागली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध टॅगलाईन तसेच आकर्षक सजावट करण्यात आली. काहींनी तर चहाच्या दुकानाला एक थीम देखील दिली. कडक स्पेशल या चहाच्या दुकानात पुणेरी पाट्या लिहीण्यात आल्या आहेत. तसेच तेथे पाच ते दहा प्रकारचे चहा मिळतात. असाच पुण्यातला तंदुर चहा देखील नागरिकांच्या पसंतीस उतरला हाेता. तंदुर मध्ये भाजलेल्या मडक्यात चहा या ठिकाणी दिला जाताे. त्याची चवही इतर चहांपेक्षा वेगळी हाेती. सध्या पुण्यातल्या चाैकाचाैकात चहाची आकर्षक दुकाने आहेत. 

सध्या पुण्यात येवले चहा, तंदुर चहा, सायबा चहा, कडक स्पेशल, भाेसले चहा, प्रेमाचा चहा असे अनेक चहाची दुकाने नागरिकांच्या पसंतीची आहेत. या प्रत्येक चहाची चव वेगळी असल्याने प्रत्येकाचा ग्राहक देखील वेगवेगळा आहे. या चहाच्या ब्रॅंण्ड साेबतच ठिकठिकाणी असलेली चहाची अमृतुल्य देखील गर्दीने फुलून जात आहेत. सध्या पुण्यात सकाळी आणि संध्याकाळी चहाच्या दुकानांवर तुडुंब गर्दी असल्याचे चित्र दिसून येते. 

Web Title: Pune is become tea capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.