आयुष कोमकर खून प्रकरणातील ८ आरोपींना अटक; ५ आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:33 IST2025-09-09T13:33:04+5:302025-09-09T13:33:56+5:30
आयुष कोमकर खून प्रकरणात यश पाटील, अमन पठाण, अमित पाठोळे, सुजल मेरगुळ यांचा सक्रिय सहभाग होता.

आयुष कोमकर खून प्रकरणातील ८ आरोपींना अटक; ५ आरोपी फरार
पुणे - नाना पेठेतील आयुष कोमकर (वय १८) खून प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण आंदेकर फॅमिलीवर गुन्हा दाखल केला होता. आज पंकज देशमुख, अपर पोलिस आयुक्त यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणात ८ आरोपींना अटक केली असल्याची माहिती दिली आहे.
पत्रकार परिषदेत पंकज देशमुख म्हणाले, आयुष कोमकर खून प्रकरणात यश पाटील, अमन पठाण, अमित पाठोळे, सुजल मेरगुळ यांचा सक्रिय सहभाग होता. यश पाटील, अमन पठाण यांनी गोळीबार केला होता. अमित पाठोळे, सुजल मेरगुळ या दोघांनी शस्त्र पुरवली होती तसेच रेकी करणे, टेहळणी करणे हा यांचा महत्त्वाचा भाग होता. गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी निलंजय वाडेकर असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात ८ आरोपींना अटक केली. ते पुढे म्हणाले, सोमनाथ गायकवाड यांचे कुटुंबीय हे मूळ टार्गेटवर होतं. सोशल मीडियावर या गँग संदर्भात कोणी रील अपलोड केलेल्या असतील त्यांच्यावर पण पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणातील अजून ५ आरोपी फरार आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. या गँग विरोधात कोणाला काही तक्रार करायची असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी.
दरम्यान, या प्रकरणात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील काही आरोपींना पोलिसांना कडून अटक करण्यात आली आहे तर काहींचा शोध सुरु आहे. सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६०), कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४१), शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय २३), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय १९) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.