मराठी माणसाची माफी मागा; कर्नाटक एसटी बस चालकाच्या तोंडाला आंदोलनकर्त्यांनी काळे फासले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:38 IST2025-02-26T10:27:18+5:302025-02-26T10:38:09+5:30
काही आंदोलनकर्त्यांनी कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळे फासले

मराठी माणसाची माफी मागा; कर्नाटक एसटी बस चालकाच्या तोंडाला आंदोलनकर्त्यांनी काळे फासले
-किरण शिंदे
पुणे - कर्नाटकमध्येमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस चालकाला कन्नड भाषा न येण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध करत पुण्यात कर्नाटक सरकारच्या बसेसला काळे फासण्याचा प्रकार घडला.
पुण्यात काही आंदोलनकर्त्यांनी कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळे फासले. तसेच, कर्नाटक सरकारने मराठी माणसाची माफी मागेपर्यंत त्यांच्या बसेस महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या प्रकारामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने कर्नाटक सरकारकडे प्रत्येक बसमागे पोलिस संरक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, कोल्हापूर आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची या परिस्थितीसंदर्भात आणि बससेवा तातडीने सुरु करण्यासंदर्भात मंगळवारी बैठक झाली. दोन्ही राज्यातील बससेवा दोन दिवसांत सुरळीत करण्याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहेत.