Praful Lodha News: हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रफुल लोढा याला पिंपरी चिंचवडमधील बावधन पोलिसांनी अटक केली. एका ३६ वर्षीय महिलेने प्रफुल लोढाविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी लोढाच्या अटकेची कारवाई सुरू केली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात प्रफुल लोढा विरोधात हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात तो अटकेत होता. बावधन पोलिसांनी ऑर्थर रोड कारागृहातून लोढाला ताब्यात घेतले.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार
१७ जुलै रोजी एका महिलेने पिंपरीच चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलीस ठाण्यात प्रफुल लोढाविरोधात तक्रार दिली होती.
महिलेने तक्रारीत म्हटलेले आहे की, प्रफुल लोढाने तुझ्या पतीला नोकरीला लावतो, असे सांगून भेटायला बोलावले. २७ मे २०२५ रोजी लोढाने बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. तुझ्या पतीला नोकरीला लावायचे असेल, तर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील, असे सांगितले.
महिलेने याला नकार दिला. तेव्हा लोढाने आता तुझीही नोकरी घालवेन, अशी धमकी दिली आणि हॉटेलच्या खोलीत बळजबरीने अत्याचार केला. या प्रकारानंतर महिला घाबरली. त्यानंतर १७ जुलै रोजी पोलिसांत तक्रार दिली होती.
ऑर्थर रोड तुरुंगाातून घेतलं ताब्यात
बावधन पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आणि लोढाला ताब्यात घेतले. ताबा मिळवण्यासाठी हस्तांतरण वॉरंट कोर्टाकडे मागण्यात आले होते. न्यायालयाने मंजुरी देताच पोलिसांनी त्याला अटक केली.