Pune Ambil Odha Slum: सगळी घरं तोडलीत, आता आम्ही कुठे जाऊ?; चिमुकल्याने सरकारला विचारले सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 11:16 AM2021-06-24T11:16:44+5:302021-06-24T11:22:46+5:30

पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईत नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Pune Ambil Odha Slum: All houses demolished, now where shall we go; little boy asked the question to government question | Pune Ambil Odha Slum: सगळी घरं तोडलीत, आता आम्ही कुठे जाऊ?; चिमुकल्याने सरकारला विचारले सवाल

Pune Ambil Odha Slum: सगळी घरं तोडलीत, आता आम्ही कुठे जाऊ?; चिमुकल्याने सरकारला विचारले सवाल

Next

पुणे: पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईत नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही नागरिकांनी यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. 

पुण्याचा दांडेकर पुलालगत असलेल्या वस्तीतल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित आहे. या वस्ती मध्ये पुराचे पाणी शिरत असल्याने महापालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेत नागरिकांना इथून हटवायची तयारी केली. मात्र यावरून स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिस्थिती चिघळली आहे. पालिका मात्र कारवाईवर ठाम असून एका पाठोपाठ एक जेसीबी इथे पाठवले जात आहेत.

पुणे महापालिकेच्या या कारवाईला नागरिकांनी विरोध केल्याने इथली परिस्थिती चिघळली आहे. अनेक नागरिकांनी इथे आंदोलन केलं.काहींनी आत्मदहन देखील करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कोणतीही सूचना न देता केवळ बिल्डर्स चा फायद्यासाठी ही कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कारवाई पूर्वी पुनर्वसन का करण्यात आलं नाही असा सवाल विचारत नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महापालिकेच्या या कारवाईनंतर एक चिमुकला माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत होता. सकाळपासूनच प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईनं चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. आमची घरं तोडण्याचं काम सुरु आहे. आमच्या माणसांना पोलीस मारहाण करत आहे. खाली जाऊन बघितलं की सगळी घरं तोडली आहे. आता आम्ही कुठे जायचं, असा सवाल चिमुकल्याने सरकारला विचारला आहे. तसेच जी माणसं आमची बाजू पोलीस आणि अधिकाऱ्यांसमोर मांडत होती. त्यांना पोलिसांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना पोलीस चौकीला घेऊन गेले, अशी माहिती सांगताना चिमुकल्याला अश्रू अनावर झाले.

दरम्यान, आंबिल ओढा परिसरातील या १०० गुंठ्याच्या प्लॉटवर शहरातील अनेक बिल्डर्संची नजर असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या वतीनं कोणतीही नोटिस आली नसल्याने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. या परिसरातील लोक गेली पन्नास वर्षे इथं राहत असून त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रयत्न  न करता महापालिका ही कारवाई केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pune Ambil Odha Slum: All houses demolished, now where shall we go; little boy asked the question to government question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app