Pune Airport : प्रजासत्ताक दिनानिमित्त विमानतळाच्या सुरक्षेत वाढ; क्विक रिॲक्शन टीम्स तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:35 IST2026-01-24T12:35:01+5:302026-01-24T12:35:32+5:30

विमानतळ परिसरात क्विक रिॲक्शन टीम्स तैनात करण्यात आल्या असून, टर्मिनल परिसरासह आजूबाजूच्या भागात गस्त वाढविण्यात आली आहे.

Pune Airport security increased on the occasion of Republic Day; Quick Reaction Teams deployed | Pune Airport : प्रजासत्ताक दिनानिमित्त विमानतळाच्या सुरक्षेत वाढ; क्विक रिॲक्शन टीम्स तैनात

Pune Airport : प्रजासत्ताक दिनानिमित्त विमानतळाच्या सुरक्षेत वाढ; क्विक रिॲक्शन टीम्स तैनात

पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणेविमानतळावर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच प्रवासी, विमाने तसेच विमानतळाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षितता करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

विमानतळ परिसरात क्विक रिॲक्शन टीम्स तैनात करण्यात आल्या असून, टर्मिनल परिसरासह आजूबाजूच्या भागात गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच, विमानतळाकडे येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवरील नाक्यांवर वाहनांची आणि प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व विमानांसाठी १०० टक्के सेकंडरी लॅडर पॉइंट चेकिंग (एसएलपीसी) अनिवार्य करण्यात आले असून, दि. ३० जानेवारीपर्यंत राहणार आहे.

याशिवाय, विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही व इतर तांत्रिक साधनांच्या माध्यमातून देखरेख अधिक मजबूत करण्यात आली आहे. तर कार्गो टर्मिनलवरील सुरक्षा उपाययोजनाही अधिक कडक करण्यात आल्या असून, ग्राउंड हँडलिंग कर्मचारी व इतर विमानतळ कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित यंत्रणांची विशेष सुरक्षा समन्वय बैठक घेण्यात आली. सर्वांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title : गणतंत्र दिवस पर पुणे हवाई अड्डे की सुरक्षा बढ़ाई गई; टीमें तैनात

Web Summary : गणतंत्र दिवस के लिए पुणे हवाई अड्डे पर सुरक्षा बढ़ाई गई। त्वरित प्रतिक्रिया दल तैनात, गश्त तेज, वाहनों की जांच कड़ी। 30 जनवरी तक 100% सेकेंडरी लैडर पॉइंट चेकिंग अनिवार्य। सीसीटीवी निगरानी और कार्गो टर्मिनल सुरक्षा कड़ी, ग्राउंड स्टाफ पर कड़ी नजर। समन्वय बैठकों से प्रभावी कार्यान्वयन सुनिश्चित।

Web Title : Pune Airport Security Beefed Up for Republic Day; Teams Deployed

Web Summary : Pune Airport enhances security for Republic Day. Quick Reaction Teams are deployed, patrolling intensified, and vehicle checks heightened. 100% Secondary Ladder Point Checking is mandatory until January 30. Enhanced CCTV surveillance and stricter cargo terminal security are in place, along with heightened vigilance on ground staff. Coordination meetings ensure effective implementation.