Pune Airport : उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम; पुण्यात येणारी-जाणारी दहा ते बारा विमाने उशिराने, प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 19:39 IST2026-01-18T19:37:39+5:302026-01-18T19:39:14+5:30
रविवारी रात्री दिल्ली, भोपाळ, लखनाै, जयपूर व बंगळुरू येथून येणाऱ्या विमानांना एक ते दोन तास उशीर झाला.

Pune Airport : उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम; पुण्यात येणारी-जाणारी दहा ते बारा विमाने उशिराने, प्रवाशांची गैरसोय
पुणे : उत्तर भारतासह काही शहरात अजूनही दाट धुके पडत आहे. त्यामुळे दिल्ली, भोपाळ, लखनाै, जयपूर व बंगळुरू या शहरातून पुण्यात येणाऱ्या जवळपास दहा विमानांना रविवारी उशीर झाला. यामुळे पुण्यातून बाहेर जाणाऱ्या दहा ते बारा विमानांना उशीर झाला. त्यामुळे पुण्यातील विमानांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रविवारी रात्री दिल्ली, भोपाळ, लखनाै, जयपूर व बंगळुरू येथून येणाऱ्या विमानांना एक ते दोन तास उशीर झाला. त्यामुळे पुण्यातून या शहरासाठी उड्डाण करणाऱ्या विमानांना तेवढाच उशीर झाला. पुणेविमानतळावरून दिवसापेक्षा रात्री उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील जास्त आहे. परंतु बाहेरील शहरात धुके पडत आहे. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या कनेक्टिव्ही विमानांना उशीर होत आहे.
त्याचा परिणाम पुण्यातील विमान प्रवाशांवर होत आहे. येणाऱ्या विमानांना उशीर होत असल्याने पुण्यातून उड्डाण होणाऱ्या विमानांनादेखील उशीर होत आहे. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर विमानाची वाट पाहत थांबावी लागत आहे. तर पुण्यातू चेन्नइला जाणाऱ्या विमानाला बंगळुरूला वळविण्यात आले. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकांना गैरसोय होत आहे.