Video : पुण्यातील येरवडा गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्यांचा विचित्र अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:37 IST2025-11-28T12:37:16+5:302025-11-28T12:37:43+5:30
- उड्डाण पुलावर अचानक ब्रेक लागल्याने मागोमाग येणाऱ्या गाड्यांची साखळीच तयार झाली आणि आठ ते दहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. या धडकेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.

Video : पुण्यातील येरवडा गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्यांचा विचित्र अपघात
पुणे - शहरातील नवले ब्रिज अपघाताची चर्चा अजूनही सुरू असतानाच येरवडा परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. गोल्फ क्लब उड्डाण पुलावर सलग दहा गाड्या एकमेकांना धडकून गंभीर अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि. २८) उशिरा रात्री हा अपघात झाला. उड्डाण पुलावर अचानक ब्रेक लागल्याने मागोमाग येणाऱ्या गाड्यांची साखळीच तयार झाली आणि आठ ते दहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. या धडकेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत कोंडी सोडवण्याचे काम हाती घेतले. स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेत अपघातग्रस्त गाड्या रस्त्याच्या कडेला करण्यास मदत केली.
या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांकडून अपघाताचे कारण शोधण्याचे काम सुरू असून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.