जेजुरीत विजेचा शॉक लागून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:04 IST2026-02-11T15:03:29+5:302026-02-11T15:04:29+5:30

पोलिस कर्मचारी, महावितरणचे अधिकारी, जेजुरी नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.

pune accident unidentified person dies of electric shock in Jejuri | जेजुरीत विजेचा शॉक लागून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जेजुरीत विजेचा शॉक लागून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जेजुरी : शहरातील चिंचेच्या बागेजवळील कडेपठार रोड परिसरात मंगळवारी (दि. १०) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. २२ केव्ही जेजुरी फिडर पिलरचा दरवाजा उघडून आत हात घातल्याने एका अनोळखी व्यक्तीस जोरदार विजेचा धक्का बसला. शॉक इतका तीव्र होता की संबंधित व्यक्ती जळून जागीच मृत्यूमुखी पडला.

प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती रिकाम्या बाटल्या गोळा करणारा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याची अधिकृत ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ महावितरण आणि पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस कर्मचारी, महावितरणचे अधिकारी, जेजुरी नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला.

अग्निशमन दलाने जळत असलेल्या व्यक्तीवरील जाळ विझवून त्याला फिडर पिलरमधून बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकरणी जेजुरी पोलीस पुढील तपास करत असून महावितरण विभागाने नागरिकांना वीज वितरणाच्या उपकरणांपासून दूर राहण्याचे आणि अशा ठिकाणी अनधिकृत प्रवेश टाळण्याचे आवाहन केले आहे.

Web Title : जेजुरी: फीडर पिलर के पास बिजली के झटके से अज्ञात व्यक्ति की मौत

Web Summary : जेजुरी में एक फीडर पिलर से जोरदार बिजली का झटका लगने से एक अज्ञात व्यक्ति की मौत हो गई। घटना चिंच बाग के पास हुई। माना जा रहा है कि मृतक बोतलें जमा करने वाला था। पुलिस मामले की जांच कर रही है। अधिकारियों ने बिजली उपकरणों के आसपास सावधानी बरतने का आग्रह किया।

Web Title : Jejuri: Unidentified Person Dies of Electric Shock Near Feeder Pillar

Web Summary : An unidentified man died in Jejuri after receiving a severe electric shock from a feeder pillar. The incident occurred near Chinch Bag. The man, believed to be a bottle collector, was found near the 22KV feeder. Police are investigating. Authorities urge caution around electrical equipment.