पुणे : शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या जंगली महाराज रोडवर आज सकाळी पीएमपीएमएल बस आणि चारचाकी कारमध्ये अपघात झाला. कारने मागून पीएमपीएमएल बसला जोरदार धडक दिल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वाहतुकीची गर्दी असताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने बसच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
विशेष म्हणजे, हा अपघात शाळेजवळ घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पालक आणि स्थानिक नागरिकांनी या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
Web Summary : A car collided with a PMPML bus on Pune's JM Road. The car was heavily damaged, but thankfully, no one was injured. Traffic was briefly disrupted. Concerns rise about student safety near the school; stricter traffic measures are demanded.
Web Summary : पुणे के जंगली महाराज रोड पर एक कार ने पीएमपीएमएल बस को टक्कर मार दी। कार बुरी तरह क्षतिग्रस्त हो गई, लेकिन शुक्र है कि कोई घायल नहीं हुआ। यातायात थोड़ी देर के लिए बाधित रहा। स्कूल के पास छात्रों की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई; सख्त यातायात उपायों की मांग की जा रही है।