शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगरमध्ये भीषण अपघात; बेधुंद कार चालकाची तीन दुचाकी अन् सहा ते सात व्यक्तींना धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:03 IST

- या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले

राजगुरुनगर - राजगुरुनगर परिसरात सातकरस्थळ येथे मंगळवारी (दि ११) रात्री हिट अँड रन प्रकरण घडले. बेधुंद अवस्थेतील कार चालकाने वेगवेगळ्या ठिकाणी तीन दुचाकी आणि रस्त्याच्या कडेला पायी जाणाऱ्या तीन बांधकाम मजुरांना धडक दिली. या धडकेत कार ओढ्यात पडली.  झाडेझुडपे असल्याने कारचे नुकसान झाले नाही. तर चालकही सुखरूप राहिला. यावेळी चालक पुर्णपणे नशेत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. वाडा रस्त्यावर सातकरस्थळ हद्दीतील ओढ्यावर रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला.मिळालेल्या माहितीनुसार, वाडा रस्त्यावर चासच्या बाजूने कार चालक वेगात येत होता. खांडगे लॉन कार्यालय समोर त्याने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोघेजण खाली पडून जखमी झाले. त्यानंतर सातकरस्थळ ग्रामपंचायत इमारती समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीला धडक दिली.

इथे दुचाकीस्वार वाचला पण दुचाकीचे पुर्ण नुकसान झाले. तिसऱ्या ठिकाणी म्हणजे प्ले टोर इमारती समोर पायी जाणाऱ्या तीन बांधकाम मजुरांना धडक देऊन पुढे लगेचच दुचाकीला जोराची धडक दिली. या सलग दोन धडकेने कार ओढ्यात जाऊन पडली. पहिल्या तिघांमधील एकाच्या पायाचा चेंदामेंदा झाला. तर पुढील अपघातात आणखी दोन जणांना गंभीर दुखापती झाल्या.अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही गंभीर जखमा होऊन ते जागेवरच बेशुद्ध पडले. नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून घेत त्यांना उपचारांसाठी राजगुरुनगर येथील रुग्णालयात दाखल केले.मात्र त्यांना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती नागरिकांनी दिली. अचानक घडलेल्या या प्रसंगाने राजगुरुनगर शहर व सातकरस्थळ परिसरात खळबळ उडाली.अनेक युवकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना उपचारांसाठी मदत केली. रस्त्यावर पडलेल्या दुचाकी बाजुला केल्या. कार चालक डॉक्टर असल्याचे बोलले जात असून शहरातील एका मोठ्या रुग्णालयाचा संचालक असल्याचे सांगण्यात येत आले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू