Video : एक सेकंदात सगळं संपलं..!  सिमेंट मिक्सरखाली चिरडून १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू, CCTV व्हिडिओ समोर

By किरण शिंदे | Updated: March 10, 2026 11:17 IST2026-03-10T11:15:58+5:302026-03-10T11:17:22+5:30

ती शिवबा चौकाजवळ पोहोचली असता पाठीमागून वेगाने येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

pune accident news everything ended in a second 18-year-old girl crushed to death under cement mixer, CCTV video in front | Video : एक सेकंदात सगळं संपलं..!  सिमेंट मिक्सरखाली चिरडून १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू, CCTV व्हिडिओ समोर

Video : एक सेकंदात सगळं संपलं..!  सिमेंट मिक्सरखाली चिरडून १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू, CCTV व्हिडिओ समोर

पुणे -  पुणे शहरालगत असलेल्या सुसगाव परिसरात मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या भीषण अपघातात १८ वर्षीय तरुणीचा सिमेंट मिक्सर ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. या दुर्घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणीचे नाव अंजली शंकर साळवे (वय १८) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (५ मार्च) सायंकाळी सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंजली साळवे ही आपल्या दुचाकीवरून सुस-नांदे रोड मार्गे जात होती. ती शिवबा चौकाजवळ पोहोचली असता पाठीमागून वेगाने येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.



धडकेनंतर अंजलीचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ती रस्त्यावर कोसळली. दुर्दैवाने त्याच क्षणी ती थेट मिक्सर ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी उपस्थित नागरिकही काही क्षण स्तब्ध झाले. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यामध्ये अपघाताचा संपूर्ण प्रकार स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संबंधित ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुसगाव आणि परिसरात वाढत्या वाहतूक वेगामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण आणि कडक कारवाईची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title : पुणे: सीमेंट मिक्सर से कुचलकर 18 वर्षीय युवती की मौत, सीसीटीवी फुटेज सामने आया

Web Summary : पुणे में सीमेंट मिक्सर ट्रक की चपेट में आने से 18 वर्षीय युवती की मौत हो गई। हादसा सुस-नांदे रोड स्थित शिव चौक के पास हुआ। सीसीटीवी फुटेज में दुखद घटना कैद हो गई। पुलिस जांच कर रही है; स्थानीय लोगों ने तेज गति पर चिंता जताई और सख्त यातायात नियंत्रण की मांग की।

Web Title : Pune: 18-Year-Old Crushed by Cement Mixer, CCTV Footage Surfaces

Web Summary : An 18-year-old girl died in Pune after being hit by a cement mixer truck. The accident occurred near Shiva Chowk, Sus-Nande Road. CCTV footage reveals the tragic incident. Police are investigating; locals cite concerns about speeding and demand stricter traffic control.