पुण्यात हडपसर महादेवनगर-मांजरी रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 11:37 IST2026-01-19T11:37:30+5:302026-01-19T11:37:55+5:30
Pune News: वाघोली रस्त्यावर सिरम कंपनी समोर टेम्पो ट्रॅव्हल बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. आदित्य बाळासाहेब शेळके (वय २०, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पुण्यात हडपसर महादेवनगर-मांजरी रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वार ठार
पुणे - वाघोली रस्त्यावर सिरम कंपनी समोर टेम्पो ट्रॅव्हल बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. आदित्य बाळासाहेब शेळके (वय २०, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.तर त्याचा मित्र मनोहर आण्णा रणसिंग (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) हा जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आदित्य व मनोहर हे दोघे सकाळी हडपसरकडून मांजरी रस्त्याने व्हर्टिव्ह एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वाघोलीकडे निघाले होते.त्यावेळी सिरम कंपनी समोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते मांजरीकडे निघाले असता मांजरीकडून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर बसची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेमध्ये आदित्य शेळके हा जागेवरच ठार झाला. तर,मनोहर रणसिंग जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस चालक माऊली अंभोरे,वय २३ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास मांजरी पोलिस करत आहेत.