शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:50 IST

Mercedes Hits Bikes In Pune: पुण्यात दारुच्या नशेत मर्सिडीज चालकाने दुचाकीस्वारला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

बंगळुरू-पुणे महामार्गावर वडगाव पुलावरील विशाल हॉटेलजवळ आज (०३ मे २०२५) पहाटे भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वारला धडक दिली.  या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याच्या मागे बसलेल्या एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 

कुणाल हुशार (वय, २३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो बीसीएचा विद्यार्थी होता. कुणाल हा रात्री धनकवडी येथील श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी मठात कीर्तन ऐकायला गेला होता. कीर्तन ऐकून घरी परतत असताना बेंगळुरू-पुणे महामार्गावर वडगाव पुलावरील विशाल हॉटेलजवळ एका भरधाव मर्सिडीजने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात कुणाल जागीच ठार झाला. तर, दुचाकीच्या मागे बसलेला प्रज्योत पुजारी (वय, २१) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पुणे शहर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम भोसले (वय, २७) असे मर्सिडीज चालकाचे नाव आहे. तर, निखिल रानवडे (वय, २६), श्रेयस सोलंखी (वय, २५) आणि वेदांत राजपूत (वय, २८) असे कारमध्ये असलेल्या इतर तिघांची नावे आहेत. हे चौघेही दारूच्या नशेत असून त्यांनी प्रथम हिंजवडीत दारु प्यायली आणि नंतर कात्रज येथे गेले. भारतीय न्याय संहिताच्या कलम १०५ अंतर्गत सध्या एफआयआर नोंदवण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात