शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वीर-सारोळा रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत चार ऊसतोड कामगारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:10 IST

तोंडल शेडगे वस्तीजवळ रात्री दुर्घटना; गुजरातमधील मजुरांचा जागीच अंत

सासवड : पुरंदर तालुक्यातील वीर-सारोळा रस्त्यावरील तोंडल गावानजीक शेडगे वस्तीजवळ सोमवारी (दि. २) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत चार ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दिनेश प्रकाश निगडे (रा. गुणंद, ता. भोर) यांनी सासवड पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन व चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी दिनेश निगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची प्राथमिक माहिती मित्र चेतन वणवे यांच्याकडून फोनद्वारे मिळाल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोंडल (ता. पुरंदर) येथील शेडगे वस्तीजवळ वीर-सारोळा रस्त्यावर चार इसम गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसून आले. घटनास्थळी पोलिस उपस्थित होते. जखमी हे निगडे यांच्या शेतात ऊसतोडीसाठी काम करणारे कामगार असल्याचे निष्पन्न झाले.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये हरिष शिवराम बरडे (वय २६), प्रदीप वसंत भोये (वय २६ दोघे रा. उमरपाडा, ता. आहवा, जि. डांग, गुजरात), अमित सनेश चौधरी (वय २६, रा. चौड, ता. आहवा, जि. डांग) व मुरलीभाई सोन्याभाई महाला (वय २२, रा. गुंडवहळ, ता. आहवा, जि. डांग) यांचा समावेश आहे. सध्या हे सर्व कामगार शेडगेवस्ती, तोंडल येथे वास्तव्यास होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सारोळ्याहून वीरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने समोरून येणाऱ्या बजाज प्लॅटिना (क्र. जीजे २१ आर १३२७) दुचाकीला जोरदार धडक दिली आणि वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. जखमींना तातडीने ॲम्ब्युलन्सद्वारे सासवड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच चौघांनाही मृत घोषित केले. सर्व मृतदेहांचे पोस्टमार्टेम करून त्यांचे पार्थिव गुजरात येथील मूळ गावी पाठविण्यात आले आहे. या अपघातप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तसेच परिसरातील नागरिकांकडून माहिती घेत अपघातास कारणीभूत अज्ञात वाहनाचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Four sugarcane workers killed in horrific road accident near Veer-Sarola.

Web Summary : Four sugarcane workers died near Veer-Sarola after an unknown vehicle hit their motorcycle. The driver fled. Police are investigating using CCTV and local information.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघात