खासगी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; बसचालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:35 IST2025-12-30T17:35:04+5:302025-12-30T17:35:25+5:30
पुणे : खासगी प्रवासी बसची धडक लागून पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. ही घटना विमाननगर भागातील गंगापुरम चौकात घडली. ...

खासगी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; बसचालकाला अटक
पुणे : खासगी प्रवासी बसची धडक लागून पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. ही घटना विमाननगर भागातील गंगापुरम चौकात घडली. याप्रकरणी बसचालकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली.
भावना सुनील रावल (वय ६६, रा. प्राईड रेसिडेन्सी, विमाननगर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बसचालक अनिल जाधव (वय २२, मूळ रा. मुखेड, जि. नांदेड, सध्या रा. भोसरी) याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना रावल सोमवारी (दि २९) सकाळी साडेनऊच्या सुमारास विमाननगर भागातील गंगापुरम चौकातून निघाल्या हाेत्या. त्यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या रावल यांना बसने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रावल यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बसचालकाला अटक करण्यात आली आहे.