एसटी ड्रायव्हरच्या शर्यतीमुळे अपघात, ब्रेक फेल झाल्याची बतावणी, एक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 04:36 PM2023-10-02T16:36:00+5:302023-10-02T16:36:44+5:30

दोघे जखमी, अनेक दुचाकीचे नुकसान...

Pune: Accident due to ST driver racing, pretending to fail brakes, one killed | एसटी ड्रायव्हरच्या शर्यतीमुळे अपघात, ब्रेक फेल झाल्याची बतावणी, एक जण ठार

एसटी ड्रायव्हरच्या शर्यतीमुळे अपघात, ब्रेक फेल झाल्याची बतावणी, एक जण ठार

googlenewsNext

भिगवण (पुणे) :पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकापासून निघालेल्या दोन एसटी ड्रायव्हरच्या पुढे घेण्याच्या शर्यतीमुळे अपघात घडून एकाला जीव गमवावा लागला. तर दोघे जखमी होऊन अनेक दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली. अपघात घडल्यावर एसटी ड्रायव्हरने भिगवण पोलिसांत हजेरी लावून ब्रेक फेल झाल्याची बतावणी केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर महामार्गावरील बसस्थानकाजवळ एसटी बसखाली गंगाराम सोमा पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भिगवण बसस्थानकापासून दोन बस पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.

बसस्थानकासाठी असणाऱ्या सर्व्हिस रस्त्याने येणाऱ्या दोन बसचालकांमध्ये पुढे जाण्याची शर्यतीमुळे हा अपघात घडला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यावेळी उजव्या बाजूने असणाऱ्या गाडीने मुख्य मार्गावर प्रवेश मिळविला. मात्र, डाव्या बाजूने येणाऱ्या बस ड्रायव्हरचे लक्ष विचलित झाल्याने मृत पवार बसखाली चिरडले गेले. यावेळी अपघातग्रस्त चालकाने बस ड्रेनेजच्या कठड्यावर चढविल्यामुळे बस थांबली. मात्र, तोपर्यंत ७ ते ८ दुचाकी गाडी खाली चेंगरल्या गेल्या. या अपघातात मृत पवार यांच्यासह दोनजण जखमी झाले.

अपघातानंतर बसचालकाने भिगवण पोलिस ठाण्यात हजर होऊन ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याची माहिती दिली. मात्र, १०० फुटांवरील स्थानकांत बस व्यवस्थितपणे थांबली असल्याचे नागरिकांनी माहिती दिली. भिगवण एसटी अपघातामुळे पुणे येथील संतोष माने एसटी अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या. तर भिगवण येथे एका मनोरुग्णाने याच भिगवण बसस्थानकातून बस चालू करून पुणे-सोलापूर मार्गावर पळविल्याच्याही आठवणी समोर आल्या. तर भिगवण येथील मुख्य मार्गावरील अनधिकृत व्यवसाय आणि पार्किंग यामुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता यामुळे वर्तविण्यात आली.

भिगवण बसस्थानकावर येणाऱ्या बसमुळे अनेक अपघात घडले आहेत. बसस्थानकावर बस आणत असताना चालक वेगाने गाड्या चालवीत असतात. जास्तीची वर्दळ आणि रहदारी असताना वेगावर नियंत्रण आणण्याची गरज आहे, असे मत माजी सरपंच पराग जाधव यांनी मांडले.

Web Title: Pune: Accident due to ST driver racing, pretending to fail brakes, one killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.