शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 21:21 IST

प्रत्यक्षदर्शींनी एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यातच कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली.

पुणे : बंगळुरू - पुणे महामार्गावर नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा शहर हादरले. दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणांतच ८  जण जळून खाक झाले. तर, तब्बल २० ते २५ जण जखमी झाले. गुरूवारी (दि. १३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला.घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यातच कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली. दरम्यान, प्रामुख्याने कंटेनरने एका ट्रॅव्हलर बसला धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी झाला. त्यामध्ये १८ ते २० प्रवासी होते. धडकेनंतर कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली आणि काही क्षणांतच आगीचे लोट आकाशात झेपावले. या दरम्यान, सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली. कार पुढे उभ्या दुसऱ्या कंटेनरमध्ये कार अडकली आणि तिने पेट घेतल्याची माहिती ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

आगीमुळे अवघ्या काही क्षणातच कार आणि कंटेनरचा समोरील भाग जळून खाक झाला. कारमधील दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. कंटेनर चालक आणि त्याचा क्लिनर यांचा देखील आगीत होरपळून मृत्यू झाला. पाच ते सात मिनिटात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होताच, त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत वाहनांचे केवळ सांगाडेच उरले होते. रात्री आठ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने तब्बल सात मृतदेह बाहेर काढले. तर जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन पोलिसांनी लगेचच वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली. घटनास्थळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात...या परिसरात याआधीही अनेक अपघात घडले असून स्थानिक नागरिकांचा संताप पुन्हा उफाळून आला आहे. ‘नवले पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात,’ अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. आगीच्या आणि धुराच्या लोटांमुळे काही काळ परिसरात लांबचे दिसतही नव्हते. बचाव पथकांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले. घटनास्थळी पसरलेला काळोख, वाहनांचे चेंदामेंदा झालेले अवशेष, आणि जखमींच्या नातेवाईकांचा हंबरडा हे दृश्य पाहून ह्रदय पिळवटून टाकणारे होते.कारमधील सीएनजीचा स्फोट...?प्राथमिक माहितीनुसार, कंटेनरने कारला पाठीमागून धडक दिल्यानंतर कारमधील सीएनजी सिलिंडरचा देखील स्फोट झाला. त्यामुळे आगीने जास्त भडका घेतला. क्षणार्धात झालेल्या घटनेमुळे कारमधील कोणालाही बाहेर पडता आले नाही, अशी माहिती देखील प्रत्यक्षदर्शींनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Highway Accident: Containers Collide, CNG Car Explodes, Seven Dead

Web Summary : A horrific accident on the Pune-Bangalore highway near Navale Bridge resulted in seven fatalities. Two containers collided with a car, triggering a CNG explosion and fire. The blaze engulfed the vehicles, trapping occupants. Approximately 20-25 people were injured. Locals demand permanent safety measures.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र