Pune Accident : वारजे येथे दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणीचा मृत्यू
By नम्रता फडणीस | Updated: November 26, 2024 17:36 IST2024-11-26T17:36:21+5:302024-11-26T17:36:21+5:30
याप्रकरणी वारजे पाेलिसांनी दुचाकीस्वारच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

Pune Accident : वारजे येथे दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणीचा मृत्यू
पुणे: भरधाव दुचाकी घसरल्याने सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना वारजे भागात घडली. गौरी संजीवकुमार कलशेट्टी (वय २०, रा. शिवाजी चौक, आंबेगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वारजे पाेलिसांनी दुचाकीस्वार अभिषेक गणेश बानगुडे (वय २४, रा. नऱ्हे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत रोहित कलशेट्टी (वय ४०) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, रोहित यांची बहीण गौरी आणि अभिषेक हे रविवारी (दि.२४) दुपारी अडीचच्या सुमारास मुळशी येथील एका मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. बाह्यवळण मार्गावर वारजे माळवाडी परिसरातील माई मंगेशकर रुग्णालयासमोर कार भरधाव आली. दुचाकीस्वार अभिषेकने ब्रेक दाबला.
दुचाकी घसरून सहप्रवासी गौरी पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.