Pune : वर्षभरात ७४ लाख अमृत ज्येष्ठ नागरिकांचा ‘लालपरी’तून प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 20:10 IST2026-02-10T20:07:04+5:302026-02-10T20:10:01+5:30

- पुणे एसटी विभागाला ५४ कोटींहून अधिक उत्पन्न  

Pune 7.4 million Amrit senior citizens travel by Pune ST bus MSRTC in a year | Pune : वर्षभरात ७४ लाख अमृत ज्येष्ठ नागरिकांचा ‘लालपरी’तून प्रवास

Pune : वर्षभरात ७४ लाख अमृत ज्येष्ठ नागरिकांचा ‘लालपरी’तून प्रवास

पुणे : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ ही ज्येष्ठांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. पुणे एसटी विभागातून जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत तब्बल ७३ लाख ७२ हजार ३६७ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ७५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व बसेसमधून वर्षभर मोफत आणि अमर्याद प्रवासाची सुविधा या योजनेतून मिळत आहे.

या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी ५८५ रुपये भरून स्मार्ट कार्ड घेतल्यानंतर संपूर्ण वर्षभर राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) सर्व बसेसमधून मोफत प्रवास करता येतो. विशेष म्हणजे, या योजनेमुळे पुणे एसटी विभागाला ५४ कोटी ७१ लाख ८५ हजार ४६१ रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, ही रक्कम महाराष्ट्र शासनाकडून एसटी विभागाला अदा केली जाते.

ऑगस्ट २०२२ मध्ये स्वातंत्र्याच्या ‘अमृतमहोत्सवा’निमित्त सुरू झालेली ही योजना अल्पावधीतच ज्येष्ठ नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. महिन्यानुसार लाभार्थ्यांची संख्या पाहता, ऑगस्ट, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. विशेषतः नोव्हेंबर २०२५ मध्ये ७ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला असून, त्या एकाच महिन्यात ५ कोटी ८५ लाखांहून अधिक उत्पन्न प्राप्त झाले आहे.

-------------

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :

-७५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक.

-सर्व एसटी बसेसमध्ये अमर्याद आणि मोफत प्रवास.

- ५८५ रुपयांचे स्मार्ट कार्ड वर्षासाठी वैध.

- ऑगस्ट २०२२ मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त योजना सुरू.

---------------

२०२५ मधील लाभार्थी आणि मिळालेले उत्पन्न :

महिना-- लाभार्थी -- उत्पन्न

जानेवारी -- ५,६५,९०६ -- ३,८६,२२,१७३

फेब्रुवारी -- ५,३६,९१४ -- ३,९०,५८,०१६

मार्च-- ५,९५,३८७ --- ४,२४,०६,३७२

एप्रिल -- ६,०५,६५७ -- ४,३४,९९,८७०

मे -- ६,०६,३६७ --- ४,५७,१५,०४८

जून -- ६,०८,८४१ -- ४,८०,७३,६३२

जुलै -- ६,०६,०३८ -- ४,८५,८५,०२२

ऑगस्ट -- ६,४६,७७२-- ४,७०,२२,५५९

सप्टेंबर-- ५,९३,३९८-- ४,१३,९६,१७७

ऑक्टोबर -- ६,२८,९९५ -- ४,५०,८८,०१३

नोव्हेंबर -- ७,००७३९ -- ५,८५,०२,८६५

डिसेंबर -- ६,६७,२५३ - - ४,९२,१५,७१४

एकूण -- ७३,७२,३६७ -- ५४,७१,८५,४६१

----------

अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांनी एसटीने प्रवास करून पुणे एसटी विभागाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठांनी या योजनेचा लाभ घ्यावा. -अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे  

Web Title : पुणे: एक वर्ष में 74 लाख वरिष्ठ नागरिकों ने 'लाल परी' से यात्रा की

Web Summary : पुणे की 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' को भारी प्रतिक्रिया। 75+ आयु के 74 लाख बुजुर्गों ने 2025 में एसटी बसों में मुफ्त यात्रा की। पुणे एसटी ने ₹54.71 करोड़ कमाए, सरकार द्वारा प्रतिपूर्ति की गई। अगस्त 2022 में शुरू हुई योजना बहुत लोकप्रिय है।

Web Title : Pune: 7.4 Million Senior Citizens Travelled via 'Lal Pari' in a Year

Web Summary : Pune's 'Amrit Senior Citizen Scheme' sees massive response. 7.4 million elders, 75+, traveled free on ST buses in 2025. Pune ST earned ₹54.71 crore, reimbursed by the government. Scheme launched in August 2022, is highly popular.