Pune: दोन वाहनातून कर्जतला नेण्यात येणारा ५०० किलो गांजा पकडला

By नितीश गोवंडे | Updated: September 2, 2023 16:54 IST2023-09-02T16:53:43+5:302023-09-02T16:54:00+5:30

पुणे : परराज्यातून पुण्यामार्गे कर्जत येथे विक्रीसाठी जाणारा ५०० किलो गांजा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ...

Pune: 500 kg ganja being taken to Karjat from two vehicles seized | Pune: दोन वाहनातून कर्जतला नेण्यात येणारा ५०० किलो गांजा पकडला

Pune: दोन वाहनातून कर्जतला नेण्यात येणारा ५०० किलो गांजा पकडला

पुणे : परराज्यातून पुण्यामार्गे कर्जत येथे विक्रीसाठी जाणारा ५०० किलो गांजा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला. ही कारवाई लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. आंध्रप्रदेश येथून हा गांजा दोन वाहनातून नेण्यात येत होता.

विशेष म्हणजे कोणाला संशय येऊ नये म्हणून चार पुरूषांसह एक महिला देखील कारमध्ये होती. यापूर्वी देखील पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध मोहीम हाती घेत कोट्यावधी रुपयांचे अंमली जप्त केले होते. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ५०० किलो गांजासह दोन चारचाकी वाहने आणि संबंधित महिलेसह चौघांना अटक केली आहे. कर्जत परिसरात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस आणि सुट्यांच्या दिवशी युवकांची मोठी गर्दी होत असल्याने तेथे हा गांजा विक्री करण्यासाठी हे पाच आरोपी जात होते. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pune: 500 kg ganja being taken to Karjat from two vehicles seized