शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

राजमाता भुयारी मार्ग रखडला; भारती विद्यापीठ परिसर वाहतूक कोंडीत अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:51 IST

- निधी असूनही काम ठप्प; पावसाळ्यात जीवितास धोका; प्रशासनावर नागरिकांचा संताप

पांडुरंग मरगजे

धनकवडी : बारमाही वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या राजमाता भुयारी मार्गातील प्रलंबित कामांमुळे वाहतुकीचे ‘तीन’ तेरा, वाजले असून, वाहतूक कोंडीच्या फटक्यात सर्वसामान्य नागरिकांचा घाम निघतोय तर पादचाऱ्यांचा श्वास गुदमरतोय. अनेक वर्षांपासून नागरिकांना या गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नगरसेवक अरुण राजवाडे यांनी सभागृहात महापौर व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असून, तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली.

केंद्राचा निधी उपलब्ध असतानाही विविध सेवा लाईन्स, पाणी, स्ट्रॉम व एमएनजीएल स्थलांतरित न झाल्यामुळे काम रखडले आहे. परिणामी, पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. राजवाडे यांनी प्रशासनाकडे तातडीने कृती आराखडा सादर करण्याची मागणी करत कात्रज ते नवले ब्रिज दरम्यानचा १२ मीटर डीपी रस्ता विकसित करणे, अपूर्ण ड्रेनेज काम पूर्ण करणे आणि त्रिमूर्ती चौक ते भारती विद्यापीठ बॅक गेट परिसरातील पार्किंग समस्येवर ठोस नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

दरम्यान, भारती विद्यापीठ मागील त्रिमूर्ती चौकात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून, नागरिक अक्षरशः कोंडीत सापडत आहेत. ‘प्रशासन मूग गिळून गप्प का?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिकांची वाढती गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून प्रलंबित कामांना गती द्यावी, अशी ठाम मागणी राजवाडे यांनी सभागृहात केली आहे. या संदर्भात प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

पावसाची चाहूल; नागरिकांसमोर पुन्हा ‘पाण्यातून वाट’ची वेळ?

अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त होत असतानाच येत्या दोन-तीन महिन्यांत मान्सून पुणे शहरात दाखल होण्याचा अंदाज आहे. मात्र, राजमाता भुयारी मार्गाचे काम अद्याप रखडलेले असल्याने यंदाचा पावसाळाही नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. दरवर्षीप्रमाणे या भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते, रस्ते जलमय होतात आणि वाहनचालकांसह पादचाऱ्यांना अक्षरशः पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतो. यामुळे अपघाताचा धोका वाढतोच, शिवाय आपत्कालीन सेवांनाही अडथळे निर्माण होतात. यावर वेळीच उपाययोजना न झाल्यास यंदाही परिस्थिती ‘जैसे थे’च राहण्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र