शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पुजाऱ्यांचा खंडोबा गडावर ठिय्या

By admin | Updated: March 26, 2015 23:04 IST

जेजुरी देवाचे दान आता न्यासाच्या खात्यात, अशा बातम्या वर्तमानपत्रांतून आल्याने येथील पुजारीवर्गात मोठी खळबळ उडाली.

जेजुरी : जेजुरी देवाचे दान आता न्यासाच्या खात्यात, अशा बातम्या वर्तमानपत्रांतून आल्याने येथील पुजारीवर्गात मोठी खळबळ उडाली. आज सकाळी ११ वाजता त्यांनी आक्रमक पवित्रा घेत खंडोबा गडावर महिला-पुरुषांसह जाऊन ठिय्या मांडला. मात्र तहसीलदारांनी त्यांना आदेशासंबंधी माहिती देऊन समज दिली.तीर्थक्षेत्र जेजुरीच्या मार्तंड देव संस्थान आणि येथील पुजारी सेवकवर्ग यांच्यात १९७१ पासून उत्पन्नावरून वाद सुरू होता. देवासमोरील जमा होणारे आणि दान पेटीतील सर्व उत्पन्न पुजारी, गुरव घेत असल्याने देव संस्थानला ते उत्पन्न मिळत नव्हते. दरम्यान, गेल्या ८ मार्च २०१५ रोजी सहायक धर्मादाय आयुक्त एन.व्ही. जगताप यांनी जेजुरीस भेट देऊन अहवाल सादर केला होता. अहवालानुसार देवस्थानचे पुजारी, गुरव व हक्कदार यांना हे उत्पन्न घेता येणार नसल्याचे आदेश बुधवारी सहायक धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले. पुरंदरच्या तहसीलदारांनी आज २६ मार्चपासून त्यांना मनाई करावी. तसेच जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार ५०- ५० टक्के उत्पन्नाची विभागणी करण्यास तयार असतील तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याची विभागणी करावी असे स्पष्ट केले होते. दुपारी २ वाजता पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात पुजारी, सेवकवर्गाला बोलावून त्यांना आदेशासंबंधी माहिती दिली. या वेळी जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके, मार्र्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, विश्वस्त अ‍ॅड. दशरथ घोरपडे, सुधीर गोडसे, तसेच नगरसेवक जयदीप बारभाई, अमोल सातभाई, माजी विश्वस्त सुनील असवलीकर, नितीन बारभाई, बाळासाहेब बारभाई, महेश आगलावे, रवींद्र बारभाई, बाळासाहेब सातभाई, सतीश कदम, दिलीप मोरे, आदी पुजारी सेवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आदेशानुसार आज पासूनच अंमलबजावणी करावी लागणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या चर्चेत पुजारीवर्गाने जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार ५०-५० टक्के उत्पन्नाची विभागणी करण्यास मान्यता दिली. (वार्ताहर)येत्या शनिवारी (दि. २८) देवासमोर देव संस्थानची अधिकृत दानपेटी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आयुक्त कार्यालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात येत आहे.- संजय पाटील, तहसीलदार