शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांसाठी सार्वजनिक जागा?

By admin | Updated: June 5, 2015 01:32 IST

एखाद्या मोकळ्या सार्वजनिक जागी नागरिकांसाठी फटाके उडविण्याची व्यवस्था राज्य सरकारला करता येऊ शकेल का आणि त्यासंदर्भात धोरण ठरविता येईल का,

पुणे : एखाद्या मोकळ्या सार्वजनिक जागी नागरिकांसाठी फटाके उडविण्याची व्यवस्था राज्य सरकारला करता येऊ शकेल का आणि त्यासंदर्भात धोरण ठरविता येईल का, अशी विचारणा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या न्या. विकास किनगांवकर व डॉ. अजय देशपांडे यांनी केली आहे.फटाक्यांचा त्रास कमी करण्यासाठी एखादी सार्वजनिक जागा प्रत्येक शहरामध्ये ठरविता येईल का याबाबत पर्यावरण मंत्रालयाचे सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांनी राज्य शासनाचे मुख्य सचिव यांनी राज्य शासनाचे मुख्य सचिव, विस्फोटक विभागाचे प्रमुख यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घ्यावा, अशी सूचनाही हरित न्यायाधिकरणाने केली आहे.नागपूर येथील पर्यावरणप्रेमी आणि फटकेविरोधी आंदोलनाचे प्रमुख डॉ. रविंद्र भुसारी यांनी याविषयी न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे. या सुनावणीदरम्यान मुंबई शहरासाठी पालिका आयुक्तांनी अशा प्रकारच्या बैठकीचे समन्वय करावे तसेच पुणे आणि इतर शहरांमध्येसुद्धा अशा प्रकारच्या कमिटी मिटिंग आयोजित करून धोरण ठरविण्यासाठी प्रयत्न करावे, असेही न्यायाधिकरणाने सूचित केले आहे.धार्मिक, सामाजिक उत्सवाच्यावेळी, लग्नप्रसंगी, मोठ्या लोकांच्या वाढदिवशी तसेच निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावरही फटके उडविले जाते. यामुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी शहरातील एकाच ठिकाणी फटाके उडवून नियंत्रण आणण्यासाठी शासनाने धोरण ठरवावे, असे न्यायाधिकरणाने सांगितले. पुढील सुनावणी १४ आॅगस्ट रोजी होणार असून या सुनावणीत शासन आपले म्हणणे सादर करेल.महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:च्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय फटाके विरोधी समित्या स्थापन कराव्यात. अशी हरित न्यायाधिकरणाने यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. त्या समित्यांचा पुढील सुनावणीवेळी अहवाल सादर करावा.- हरित न्यायाधिकरण