शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

आंदोलनाचा इतर रुग्णांना त्रास होतोय; दीनानाथ रुग्णालयाबाहेर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:45 IST

आंदोलनामुळे रुग्णालयमधील रुग्ण व नातेवाईक यांना खुप त्रास हो असून रुग्णांच्या मनामध्ये नाहक भिती उत्पन्न होत आहे

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर तनिषा भिसे (वय २७)  या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पुण्यातील पक्ष, संघटना यांच्याकडून रुग्णालयाबाहेर मोर्चा, आंदोलने, निदर्शने आंदोलने सुरु आहेत. याचा रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक तसेच डॉक्टरांना त्रास होत असल्याने पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत.  

 दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे तनिषा सुशांत भिसे या महिलेचा उपचारामध्ये दिरंगाई झाल्याने मृत्यु झाला आहे. त्यानंतर ५ मेपासुन विविध पक्षाचे कार्यकर्ते यांच्याकडून मोर्चे, आंदोलने, निदर्शने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार व आवारात होत आहेत. त्याचा रुग्णालय मधील रुग्ण व नातेवाईक यांना खुप त्रास जात आहे. तसेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या मनामध्ये नाहक भिती उत्पन्न होत आहे. आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊन रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला व रुग्णांच्या नातेवाईकांना जाण्यायेण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. मोर्चा, आंदोलने, निदर्शने मध्ये बाहेरील व्यक्तींना मोठ्या जमावाने भाषणे, घोषणा देणे सार्वजनिक शांततेचा भंग करुन रुग्णालयाचे वातावरण बाधित करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कार्यात व्यत्यय निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे.

रुग्णालयाच्या आवारात येणाऱ्या रुग्ण, रूग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी यांच्या हिताच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णास शांततामय वातावरणाची आवश्यकता आहे. म्हणून दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटल पुणे व सभोवतालच्या १०० मीटर परिसरात निर्बंध घालणे गरजेचे असल्याचे सांगत शर्मा यांनी प्रतिबंधात्मक आदेश घातले आहेत.  

काय आहेत प्रतिबंधात्मक आदेश...  

१. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे, हा परिसर व त्याचे सभोवतालच्या १०० मीटर परिसरात रुग्णांच्या नातेवाईकाशिवाय इतर इसमांना एकत्र जमण्यास किंवा रुग्णालयात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.२. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे, परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे. सदरचा आदेश संबंधीत रुग्ण, रुग्णवाहिका चालक, रुग्णालयातील कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी/सुरक्षा अधिकारी यांना लागु होणार नाहीत.३. सदर रुग्णालय परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे..४. सदर रुग्णालय परिसरात कोणताही आक्षेपार्ह, वाद निर्माण होईल असा मजकूर लिहिण्यास, अगर छापील मजकूर चिकटविण्यास मनाई करण्यात येत आहे.सदरचा आदेश दि. ०९/०४/२०२५ रोजी पासून ते दिनांक १९/०४/२०२५ रोजीपर्यंत अंमलात राहील. सदरच्या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीagitationआंदोलनhospitalहॉस्पिटलSocialसामाजिकdoctorडॉक्टरcommissionerआयुक्तMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार