देहूगाव परिसरात सुरू होता वेश्याव्यवसाय; २२ वर्षीय तरुणीची सुटका, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 16:24 IST2022-06-09T16:18:17+5:302022-06-09T16:24:51+5:30
अभिरूची लॉजवर कारवाई करण्यात आली...

देहूगाव परिसरात सुरू होता वेश्याव्यवसाय; २२ वर्षीय तरुणीची सुटका, एकाला अटक
पिंपरी : देहूगाव ते तळवडे रोड येथील अभिरूची लॉज येथे वेश्या व्यवसायाप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तिघांवर गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी ( दि. ८ ) अभिरूची लॉज येथे करण्यात आली आहे. या प्रकरणी एका महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राशीद हाफीज बेग ( वय २३) रा. देहूगाव याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर लॉजचे मालक वसंत शेट्टी, रा. चिखली, राणी काळे, रा. भोसरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वसंत शेट्टी, राणी काळे यांनी एका २२ वर्षीय तरूणीला जबरदस्तीने वेश्या व्यवसाया करिता तयार केले.
तिला पैशांचे अमिष दाखऊन वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. तिला वेश्याव्यवसायाला आणून त्याच्यातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिविका भागवत होते. कारवाईमध्ये मोबाईल, रोख रक्कम, असा मुद्देमाल मिळून आला आहे.